HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राठोड यांनी राजीनामा सोपवला हे वृत्त चुकीचे – संजय राऊत

मुंबई | “वनमंत्री संजय राठोडांनी राजीनामा दिल्याची माहिती माझ्याकडे नाही. त्याबाबत मुख्यमंत्री माहिती देतील. त्याबाबत मी भाष्य करणं योग्य नाही. ती माहिती चुकीची आहे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर मागील काही दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

पूजाच्या आत्महत्या प्रकरणात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधील आवाज हा वनमंत्री संजय राठोड यांचाच असल्याचा उघड दावा भाजपने केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारवर दबाव वाढल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर अचानाकपणे राठोड यांनी त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवल्याचे म्हटले जाऊ लागले. मात्र, हे वृत्त शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फेटाळले असून ही माहिती चुकीची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

याबाबत बोलताना, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. येथे कायद्याचे राज्य आहे. प्रत्येक गोष्ट कायद्याच्या चौकटीत होतील. या प्रकरणात उच्च स्तरीय चौकशी सुरु आहे तपास हा एकाच चौकटीत फिरत नसतो. वेगवेगळ्या दिशेने तपास केला जातो. या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं लक्ष आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांचेसुद्धा लक्ष आहे. राठोड यांच्या राजीनाम्याविषयी माझ्याकडे माहिती नाही. मुख्यंमंत्र्यांकडे राजीनामा दिला असेल, तर याविषयी ते जाहीर करतील. मी त्याविषयी बोलणे बरोबर नाही. राजीनाम्याची माहिती चुकीची आहे,” असे संजय राऊत म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मालेगावात कोरोनाचा दुसरा बळी, आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत आणखी भर

News Desk

कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी ‘रॅपिड टेस्ट’ला केंद्राकडून मान्यता, आरोग्यमंत्र्यांची माहिती

News Desk

चंद्रकांतदादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म चंपा आहे, त्यांनी राग मानून घेऊ नये – जयंत पाटील  

News Desk