HW News Marathi
महाराष्ट्र

आमच्याकडे लपवण्यासारखं काही नाही, लपवाछपवी करणारे पळून जातात – संजय राऊत 

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून नोटीस देण्यात आली. आज (२९ डिसेंबर) त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी ५ जानेवारीपर्यंत वेळ वाढवून घेतली आहे. यावर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ज्यांच्याकडे लपवण्यासारखं काही असतं, ते घाबरुन भाजपमध्ये प्रवेश करतात, मात्र आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेत राहणार आणि शिवसेनेतच मरणार, हे सरकार पाच वर्ष टिकणार, असं राऊत यांनी ठणकावून सांगितलं. मला धमकी देणारा अजून जन्माला यायचाय, जो मला धमकी देईल, तो राहणार नाही, असा इशाराही राऊतांनी दिला आहे.

ईडी ही सरकारी संस्था आहे. सरकारी कागदपत्रांकडे कानाडोळा करु शकत नाही, भले कायद्यावर कोणाचाही दबाव असला, तरी आम्ही कायदे मानतो. कायद्यांचं पालन करतो. मी अद्याप ईडीची नोटीस पाहिली नाही, त्याची मला गरजही वाटत नाही, पण तिचं उत्तर देणार आहोत, असं संजय राऊत म्हणाले आहेतहे राजकारण कसं सुरु आहे, ते मला माहिती आहे, ते चालू द्या, मला त्यात पडायचं नाही, असं राऊतांनी स्पष्ट केलं. भाजपच्या त्या तीन नेत्यांबद्दल विचारलं असता हळूहळू त्यांची माहिती देणार असल्याचं संजय राऊत म्हणाले.

आमच्याकडे लपवण्यासारखं काही नाही, लपवाछपवी करणारे पळून जातात, आम्ही मध्यमवर्गीय कुटुंब सरळमार्गाने सरकारी यंत्रणांना सामोरे जातो. सरकार पाडण्याची धमकी दिली जात आहे, मात्र मला धमकी देणारा अजून जन्माला यायचा आहे, जो मला धमकी देईल, तो राहणार नाही, असं राऊतांनी निक्षून सांगितलं.

सध्या ईडीसारख्या सरकारी संस्थांना काही काम राहिलेलं नाही. भाजपच्या विरोधकांचा मानसिक छळ करणे हे त्यांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यांनाही काही काम हवं, त्यांना सरकारचे आदेश पाळण्याचं काम करावं लागत आहे. ईडीची मला कीव येते, कारण अशा सरकारी संस्थांना एके काळी प्रतिष्ठा होती, तरीही सत्यमेव जयतेचा शिक्का असलेल्या सरकारी कागदपत्रांचा मी आदर करत राहीन, असं संजय राऊत यांनी सांगितलं. राज्यसभा उमेदवारीच्या वेळी प्रतिज्ञापत्रात मी सगळी माहिती दिली होती, ज्यांच्याकडे लपवण्यासारखं काही असतं, ते घाबरुन भाजपमध्ये प्रवेश करतात, आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेतच राहणार आणि शिवसेनेतच मरणार, हे सरकार पाच वर्ष टिकणार, असं राऊत यांनी ठणकावलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आपला पगार जनतेच्या घामाच्या पैशांतून मिळतो याचे भान ठेवा – अजित पवार

News Desk

“शेतकऱ्यांना वीज बिल भरावंच लागेल”,उर्जामंत्री भडकले!

News Desk

बेकायदा भोंग्यांबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार की नाही हे सांगा, माधव भांडारींचा राज्य सरकारला सवाल

Aprna