HW News Marathi
महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांविरोधात सव्वा रुपयाचा दावा ठोकणार, संजय राऊतांचे वक्तव्य!

मुंबई। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सामनाच्या अग्रलेखातून हल्लाबोल केला होता. संजय राऊतांना कोल्हापूरातुन पळ काढावा लागला आणि विधानसभा निवडणुकीत विजय मिळवताना तोंडाला फेस आला होता असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होते. राऊतांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर देत ईडीची कारवाई लागल्यावर संजय राऊतांच्या तोंडाला फेस आला होता. तसेच संजय राऊतांच्या राष्ट्रवादी प्रेमामुळे शिवसनेचे नुकसान होत असल्याचे म्हटलं आहे. पीएमसी बँकेसंबंधात आरोपही केले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच पाटलांविरोधात सव्वा रुपयाचा दावा ठोकणार असल्याचेही राऊत यांनी म्हटलं आहे.

आम्ही त्यात काहीही बदल न करता छापले

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांना चंद्रकांत पाटील यांनी पाठवलेलं पत्र राऊत यांनी सामनामध्ये जसेच्या तसं छापलं आहे. यावर संजय राऊतांनी म्हटलं आहे की, चंद्रकांत पाटील त्यांच्या सापळ्यात अडकले आहेत. भाजपची लोकं त्यांच्याच सापळ्यात अडकत असतात. चंद्रकांत पाटील यांनी आरोप करुन सामनात छापण्यासाठी पाठवले आणि ते आम्ही त्यात काहीही बदल न करता छापले असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

यांची जेवढी लायकी तेवढाच दावा लावायचा

पुढे संजय राऊत यांनी म्हटलंय की, आमच्यावर टीका असतानाही पत्र काना मात्र्याचा बदल न करता छापले आहे. प्रचंड टीका आणि घाणेरड्या शब्दात टीका केली आहे. सध्याच्या भाजपची ती संस्कृती आहे. पाटील यांनी दळभद्री आरोप केले आहेत. पीएमसी बँक बाबत केलेल्या आरोपांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची सूचना दिली आहे. दावा लावू पण इतर नेते १०० कोटी, १५० कोटी लावतात तसा नाही सव्वा रुपयाचा दावा लावू असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच यांची जेवढी लायकी तेवढाच दावा लावायचा असं संजय राऊत यांनी म्हटंल आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साताऱ्यात ऐतिहासिक भवानी तलवारीची मिरवणूक

News Desk

शरद पवारांनंतर जयंत पाटलांनी घेतली पुन्हा कर्नाटक मुख्यमंत्र्यांची भेट !

News Desk

करुणा धनंजय मुंडे यांच्याकडून नव्या पक्षाची घोषणा; परळीमध्ये निवडणूक लढवणार?

Aprna