HW News Marathi
महाराष्ट्र

अशोक चव्हाणांच्या बोलण्याशी मुख्यमंत्र्यांचा थेट संबंध नाही – संजय राऊत

पुणे | काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण जे बोलतात, सांगतात त्याच्याशी मुख्यमंत्र्यांचा थेट काहीही संबंध येत नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. आज पुण्यात पत्रकारांशी ते संवाद साधत होते. काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नाही, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले होते. त्यावर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

“अशोक चव्हाण जे बोलतात किंवा जे काही सांगतात, त्याच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा थेट काहीही संबंध येत नाही. हा विषय कॅबिनेटचा आहे आणि तो कॅबिनेटमध्ये सुटू शकतो,” असे संजय राऊत म्हणाले आहेत.

तर, मंत्री विजय वडेट्टीवार असं म्हणाले की, “मी अशोक चव्हाण यांचं भाषण ऐकले नाही. पण मधल्या काळात काही निधी कमी मिळाला होता, तेव्हा बाळासाहेब थोरात यांनी बैठक घेऊन प्रश्न मिटवला होता. सर्वांना समान निधी मिळाला आहे. आता सरकारमध्ये कुरबूर नाही. ज्यांनी देव पाण्यात बुडवून ठेवले त्यांचं स्वप्न पूर्ण होणार नाही”,असं सांगत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे”.

दरम्यान, “मी तसं म्हणालोच नाही, तिथेही निधी मिळायला पाहिजे, अशी अपेक्षा असल्याचे मी सांगितले”, असे म्हणत सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी काँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नसल्याच्या विधानावरून यू-टर्न घेतला आहे. काँग्रेसच्या महापालिकांना निधी दिला जात नाही, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. मी तसं म्हणालो नसल्याचं सांगत अशोक चव्हाणांनी एकप्रकारे हा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिंधुताई सपकाळ यांना महाराणी अहिल्याबाई होळकर नारीशक्ती पुरस्कार जाहीर

Gauri Tilekar

रमाई आंबेडकरांच्या पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे राष्ट्रपतींच्याहस्ते अनावरण

News Desk

मोदीजी नोटेवरून गांधींचा फोटो हटवून स्वतःचा फोटो छापतील- नवाब मलिक

News Desk