HW News Marathi
महाराष्ट्र

…पण मी समोरच्याची वाट लावल्याशिवाय गप्प बसत नाही ! | शिवेंद्रराजे भोसले

सातारा | साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे यांना अप्रत्यक्ष इशारा दिला. यावेळी शिवेंद्रराजे अत्यंत आक्रमक पवित्र्यात पाहायला मिळाले. शिवेंद्रराजे यावेळी म्हणेल कि, “मी उदयनराजेंविरोधात विधानसभा निवडणूक लढवून आलेला माणूस आहे. माझी वाट लागली तरी चालेल पण समोरच्याची वाट लावल्याशिवाय मी गप्प बसत नाही.” दरम्यान शिवेंद्रराजे यांच्या या आक्रमक इशाऱ्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. शिवेंद्रराजे यावेळी जावळी येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते.

“मी कुरघोड्या करत नाही समोरासमोर दोन हात करण्याची माझी तयारी असते. मी पाठीत खंजीर खुपसत नाही. आमदार शशिकांत शिंदे यांना पाडण्याचा आपण कोणताही प्रयत्न केला नाही. मी विरोधात काम केलं आहे असे अन्य आमदार का म्हणत नाहीत? आमदार शशिकांत शिंदे याबाबत व्यक्त करत असलेली प्रतिक्रिया चुकीचे आहे. मला त्यांना पाडायचे असते तर पहिल्या निवडणुकीत पाडले असते त्यांच्या पराभवाचे खापर आपल्यावर फोडू नये”, अशी आक्रमक प्रतिक्रिया भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive: मी राजकीय षडयंत्राचा बळी | एकनाथ खडसे

News Desk

लॉकडाऊनच्या काळात व्यापाऱ्यांचे कर्जावरील व्याज माफ करावे, व्यापाऱ्यांची शरद पवारांकडे निवेदनाद्वारे मागणी

News Desk

चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

Aprna