मुंबई | केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष गेल्या काही दिवसांपासून अधिकच वाढत असताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकार महाराष्ट्राबाबत दुजाभाव करत असल्याचा आरोप करत रेमेडेसिविरचा पुरवठा थांबवल्याने आरोप केला आहे. तर दुसरीकडे युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी उपरोधिकपणे केंद्र सरकारवर टीका केली आहे. सत्यजीत तांबे यांनी उपरोधिक ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
काय आहे सत्यजित तांबे यांचे ट्विट?
सत्यजीत तांबे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पीएमओ कार्यालयादरम्यान झालेला काल्पनिक संवाद मांडला आहे. या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पीएमओ कार्यालयालामध्ये फोन करतात. ते पीएमओ कार्यालयााला महाराष्ट्राला ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीरच्या पुरवठ्यासंदर्भात नरेंद्र मोदी यांच्याशी बोलायचं असल्याचं सांगतात. त्यावर पीएमओ कार्यालयाकडून पीएम सध्या डू नॉट डिस्टर्ब मोडवर असल्याचं उत्तर येतं. यावर उद्धव ठाकरे पंतप्रधान कधी उपलब्ध होतील, असं विचारतात. त्यानंतर पीएमओ कार्यालय ते 2 मेनंतर सर्व राज्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर उपलब्ध होतील, असं सांगितले जाते. सत्यजीत तांबे यांनी या उपरोधिक ट्विटद्वारे केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
CM Uddhav T- Hello, Is it PMO ?
PMO- Yes Sir.
UT- I need to speak to PM for urgent Oxygen & Remedisivir supply for Maharashtra.
PMO- Sir, PM Sir is on "Do Not Disturb" mode.
UT- Ok, but when will he be available?
PMO- After 2nd May once all state elections are over.
🤷♂️— Satyajeet Tambe (@satyajeettambe) April 17, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना २४ तासांत ३ वेळा फोन केला होता
महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती रोज चिंताजनक होत चालली आहे. वाढत्या कोरोनामुळे राज्यात ऑक्सिजन, रेमेडेसिविर, लस सगळ्याच गोष्टींचा आता तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या २४ तासांत ३ वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा उद्रेक आणि ऑक्सिजन तुटवड्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळेच महाराष्ट्राला १२०० ते १५०० मेट्रीक टन ऑक्सिजन मिळावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.