HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यात शाळा नव्या वर्षात सुरु होणार  – मुरलीधर मोहोळ

पुणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील शाळा बंद आहेत. केवळ ऑनलाईन शिक्षणच सुरु आहे. अशात पुण्यातील महापालिका आणि खासगी शाळा येत्या तीन जानेवारीपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला असून पाल्यांचे आरोग्य आणि पालकांचा हमीपत्रांना मिळालेला अत्यल्प प्रतिसाद या पार्श्वभूमीवर शाळा बंदचा निर्णय घेतला आहे’, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

पुणे शहरातील शाळा १४ डिसेंबरपासून सुरु होणार होत्या. मात्र महापौर मोहोळ यांनी पालक संघटना चर्चा करत आणि कोरोनाची सद्यस्थिती लक्षात घेऊन शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे लेखी आदेशही महापालिका प्रशासनाने जारी केले आहेत. गेल्यावेळी शाळा सुरु करण्यासंदर्भात पालकांचे अवघे ५ टक्के हमीपत्र जमा झाले होते. यावेळीही हीच स्थिती पाहायला मिळत आहे.

महापौर मोहोळ म्हणाले, ‘कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र असे असले तरी शाळा सुरु करण्याबाबत पालक फारसे सकारात्मक नाहीत, असे चित्र आहे. तसेच पाल्यांचे आरोग्य हाही महत्त्वाचा विषय असून याबाबत सर्व घटकांशी चर्चा करुन आपण निर्णय घेतला आहे. येत्या ३ जानेवारीच्या आधी कोरोना संसर्ग आणि इतर बाबींचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेणार आहोत’.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातील भाजप ‘शिवभक्तां’चे मौन चिंताजनक – सामना अग्रलेख

News Desk

नरेंद्र पाटलांचं ठरलं ! फडणवीस सांगतील तेव्हा भाजपात प्रवेश करणार..

News Desk

सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत ५ जणांचा मृत्यू, आरोग्यमंत्र्यांची माहिती

News Desk