HW News Marathi
महाराष्ट्र

अमरावती हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी १४४ कलम लागू

मुंबई | त्रिपुरा हिंसाचाराचे लोण महाराष्ट्रात पसरले आहे. त्रिपुरात झालेल्या घटनेच्या निषेदार्थ अमरावतीत काल (१२ नोव्हेंबर) काढलेल्या रॅली जमावानं पोलिसांवर दगडफेक केल्यामुळे हिंसक वळण आले होते. या पार्श्वभूमीवर विरोधात भाजप आणि हिंदू संघटनांनी अमरावतीत आज (१३ नोव्हेंबर) बंद पुकारण्यात आला होता. दरम्यान, संघटनाने पुकारलेल्या बंदात मोठ्या संख्येनं लोक जमले होते. तर यावेळी जमावानं रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी करत दुकांनाची तोडफोड करण्यात आली होती. यामुळे अमरावतीत तणावाचं वातावरण निर्णाण झाले होते. अमरावतीत पोलिसांनी सुरक्षेसाठी कलम १४४ लागू केले आहे. यानुसार पोलिसांनी जमावबंदी अर्थात कर्फ्यू लागू केली आहे.

भाजप आणि हिंदू संघटनांनी अमरावतीत कडकीत बंद पुकारला होता. परंतु अमरावतीतील मोठ्या संख्येने जमाव एकवटला आणि दुकानांची तोडफोड केली गेली. पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रूधूर आणि लाठीजार्च केला. तसेच पोलिसांनी शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन पोलीस (Amravati Police) आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जनतेला केले आहे.

अमरावतीत इंटनेट बंद

अमरावतीत बंदला हिंसक वळण आल्यामुळे पुढील चार दिवस इंटनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.अफवांवर पसरू नये. यासाठी इंटनेट बंद केले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी अमरावतीत १४४ लागू करण्यात आले आहे. १४४ कलम लागू असल्यानं अमरावती परिसरात कोणतीही हिंसक घटना घडवणाऱ्यांना पोलीस तत्काळ अटक करू वर्षभराच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकतं.

 

नेमके काय आहे प्रकरण

त्रिपुरात मुस्लीम समाजावर होत असलेल्या कथित हिंसाचार पार्श्वभूमीवर राज्यात विरोध दर्शविणारी रॅली काल ( १२ नोव्हेंबर) काढण्यात आली होती. या रॅलीला हिंसक वळण लागले. अनेक ठिकाणींनी दुकानांची तोडफोड केली तर काही दुकानं जबरदस्तीने बंद करण्यात आली. राज्यातील मालेगाव, नांदेड आणि अमरावती या ठिकाणी रॅलीला हिंसक वळण आलं.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप कार्यकारणीची उद्या मुंबईत बैठक होणार

News Desk

राष्ट्रवादीला धक्का ,अनिल देशमुखांच्या मुंबईसह १० ठिकाणी CBI चे छापे !

News Desk

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची कर चुकविणाऱ्‍यांविरूद्ध विशेष मोहीम; सुमारे २०० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी दोन व्यक्तींना अटक

Aprna