Site icon HW News Marathi

दूरदर्शनमधील ‘आजच्या ठळक बातम्या’ सांगणारा भारदस्त आवाज प्रदीप भिडे काळाच्या पडद्याआड

मुंबई | दूरदर्शनचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे जेष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन झाले आहे. गेल्या काही काळापासून प्रदीप भिडे हे आजार होते. प्रदीप भिडे यांचे आज (7 जून) वयाच्या 64 व्या वर्षी  मुंबईत निधन झाले. ऑल इंडिया रेडिओ पुणे आणि सह्याद्री बातम्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन भिडेंच्या निधनाची बातमी दिली आहे.

भिडेंनी १९७४ ते अगदी २०१६ पर्यंत त्यांनी दूरदर्शनसाठी वृत्तनिवेदक म्हणून काम केले होते.  भिडेंनी ‘आजच्या ठळक बातम्या’ असे सांगणार भारदस्त आवाज काळाच्या पडद्याआड. भिडेंनी रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेची पदवी घेतली होती. भिडेंनी बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम केले असून रत्नाकर मतकरी यांच्या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांची नाळ नाट्यक्षेत्रा जोडली गेली होती. भिडेंनी शेकडो कार्यक्रमचे सूत्रसंचालन केले होते.

 

Exit mobile version