HW News Marathi
महाराष्ट्र

शबाना आझमी यांच्या कारचा खालापूर टोलनाक्याजवळ भीषण अपघात

मुंबई । ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीचा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात शबाना आझमी गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. शबाना आझमी यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. अपघाताबाबत अधिक तपशील अद्याप हाती आलेला नाही.

शबाना आझमी यांना कळंबोली येथील महात्मा गांधी रुग्णालयात (एमजीएम) दाखल करण्यात आले आहे. शबान यांच्यासोबत कारमध्ये जावेद अख्तरही होते. मात्र त्यांना कोणताही इजा झालेली नाही, असे सांगण्यात आले. शबाना यांच्या कारची ट्रकवर मागून धडक बसल्याने हा अपघात झाला. अपघातात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांची प्रगती! – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Manasi Devkar

अधिवेशन संपण्यापूर्वी कलम ३५३ विषयासंदर्भात बैठक घेऊन पुढची दिशा ठरवणार – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

Aprna

गृहमंत्री अनिल देशमुख गुन्हेगारांच्या गराड्यात,औरंगाबाद दौऱ्याचा एक फोटो झाला वायरल

News Desk