HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

“सोनू सूदची समाजसेवा ही फक्त राज्याबाहेरील लोकांपुरतीच आहे का?”, शालिनी ठाकरेंचा सवाल

मुंबई | कोरोनाकाळात अभिनेता सोनू सूद लोकांसाठी देवदूत बनला होता. आता याच देवदूतावार मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी प्रश्न उठवला आहे. मुंबईत राहून इथे नाव आणि पैसा कमावून यांची समाजसेवा ही फक्त राज्याबाहेरील लोकांपुरतीच आहे का?, असा सवाल शालिनी ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

पूरपरिस्थितीत मात्र हे महात्मे गायब आहेत

शालिनी ठाकरे यांनी सोनू सूद वर प्रश्न उठवला आहे. कोरोना काळात सोनू सूद नावाच्या एका महान ‘मसीहा’चा जन्म झाला होता. पण कोकणच्या पूरपरिस्थितीत मात्र हे महात्मे गायब आहेत. मुंबईत राहून इथे नाव आणि पैसा कमावून यांची समाजसेवा ही फक्त राज्याबाहेरील लोकांपुरतीच आहे का?, असा सवाल शालिनी ठाकरे यांनी केला आहे. याआधी मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही बॉलिवुडच्या कलाकारांना टोला लगावला होता. त्यानंतर आता मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी सोनू सूदवर भाष्य करत त्याच्यावर खोचक सवाल केला आहे. त्यामुळे आता सोनू सूद यावर काय प्रतिक्रिया देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

काय आहे ट्विट?

शालिनी ठाकरे यांनी ट्विट करत त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. ‘ याआधी मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही बॉलिवुडच्या कलाकारांना टोला लगावला होता. त्यानंतर आता मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी सोनू सूदवर भाष्य करत त्याच्यावर खोचक सवाल केला आहे. त्यामुळे आता सोनू सूद यावर काय प्रतिक्रिया देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे’, हे ट्विट त्यांनी केलं आहे.

Related posts

भाजप कडून बलात्का-यांची पाठराखण | राज ठाकरे

News Desk

भाजपाचा सभात्याग, कुमारस्वामींचे विधानसभेत बहुमत सिद्ध 

News Desk

राज्यातील भूमिपुत्रांना उद्योगात ७० टक्के प्राधान्य देणार, कमलनाथ यांची घोषणा

News Desk