HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांनी बोलावली बैठक, संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर निर्णय

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कालच्या गुप्त भेटीमुळे आता महाविकास आघाडीमध्ये पडसाद उमटलेले दिसत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत तातडीने बैठक बोलावली आहे. काल (२६ सप्टेंबर) संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांनी ग्रँड हयात या हॉटेलमध्ये भेट घेतली होती.

शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज बैठक होणार आहे. आज (२७ सप्टेंबर) संध्याकाळी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवास्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दोन्हीही महत्वाच्या नेत्यांनी सूचक विधान केल्यामुळे शरद पवारांनी ही बैठक बोलावल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या बैठकीत काय होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दक्षिण मुंबई वीजपुरवठा खंडित प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करणार! – डॉ.नितीन राऊत

Aprna

ED कडून खडसेंनी तब्बल 9 तास चौकशी ! बाहेर पडल्यावर काय दिली प्रतिक्रिया ?

News Desk

महावीर जयंती, हनुमान जयंती, ‘शब्ब-ए-बारात’साठी घराबाहेर पडू नका, उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

News Desk