HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामात संवाद दिसत नाही, डायलाॅग ठेवण्याचा पवारांचा सल्ला

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा आज (१३ जुलै) शेवटचा भाग प्रसारित झाला. यात पवारांनी उद्धव ठाकरे यांच्या कामाची पद्धत वेगळी आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची कामाची पद्धत वेगळी आहे असे म्हटले. उद्धव ठाकरेंच्या कामात आम्हाला उणं दिसत नाही, फक्त संवाद कमी दिसतो, आणि लोकशाहीत डायलॉग हवा असतो, असे शरद पवार म्हणाले होते.

मुलाखतीत शरद पवार नेमकं काय म्हणाले?

आमच्या लोकांची एक सूचना असते, आग्रह असतो, की आपण डायलॉग ठेवा. संसदीय लोकशाहीमध्ये डायलॉग हा कायम ठेवला पाहिजे. तो डायलॉग ठेवला तर मतभेदाची चर्चा सुद्धा होणार नाही. कारण ठाकरेंच्या कामाच्या पद्धतीमध्ये आम्हाला काही उणं दिसत नाही, फक्त डायलॉग दिसत नाही” असं म्हणत पवारांनी ठाकरेंकडून संवादाची अपेक्षा व्यक्त केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची तब्येत बिघडली, AIIMS मध्ये केले दाखल

News Desk

आता शिवसेनाप्रवेशाच्या चर्चांना भुजबळ स्वतःच देणार पूर्णविराम ?

News Desk

उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्ष एक नंबरच पक्ष होण्यास वेळ लागणार नाही, खडसेंचा विश्वास

News Desk