HW News Marathi
महाराष्ट्र

सुशांतसिंग प्रकरणाचा तपास डॉ नरेंद्र दाभोळकरांसारखा होऊ नये, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई |अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या तपासकार्याप्रमाणे याची परिणती होणार नाही, अशी आशा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. आतापर्यंत गोळा केलेले पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने काल (२० ऑगस्ट) मुंबई पोलिसांना दिले आहेत.

‘सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास सीबीआयच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करून चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल,’ अशी आशा शरद पवारांनी व्यक्त केली आहे. तसेच, ‘२०१४ रोजी डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली होती. मात्र अद्यापही योग्य न्याय न मिळाला नाही. याची पुनरावृत्ती होणार नाही’, असेही त्यांनी ट्विट करत म्हटले आहे.

दरम्यान, आज (२० ऑगस्ट) डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने शरद पवार यांनी ट्वीट करून अभिवादन केले आहे. दाभोलकरांनी अंधश्रद्धेविरोधातात, अनिष्ठ रुढींविरोधात आवाज उठवला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश

Aprna

OBC Reservation: आता ‘या’ तारखेला होणार सुनावणी

News Desk

शरद पवारांनी शतक मारावं पण शतक मारताना आमच्या लेकराबाळांना मारू नका – सदाभाऊ खोत

News Desk