HW News Marathi
महाराष्ट्र

‘शरद पवारांचं ना. धो. महानोरांना पत्र’

मुंबई। ज्येष्ठ कवी ना. धो. मनोहर यांच्या पत्नी सुलोचना महानोर यांचा १० सप्टेंबरला निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धो. मनोहर यांना पत्र लिहिलं आहे. शरद पवार यांनी एक पत्र लिहून सुलोचना महानोर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसंच ना. धो महानोर यांना आपल्या शब्दांनी धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

‘हा आपल्या आयुष्यातील आत्यंतिक वेदनादायी क्षण आहे. आपण हळवे आहात. त्यामुळे अधिक काळजी वाटते. संध्यासमयी सावली साथ सोडते हा निसर्गाचा कटू नियम आपल्या अनुभवी आला. पण धीर धरा, स्वत: सांभाळा!’ अशा शब्दात शरद पवार यांनी ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांना धीर दिला आहे.

काय आहे पत्रात?

प्रिय नामदेवराव,

आपल्या सहचारिणी ‘सुलोचना वहिनी’ यांचे काल दुःखद निधन झाल्याची वार्ता समजली. हा आपल्या आयुष्यातील आत्यंतिक वेदनादायी क्षण आहे. आपण हळवे आहात, त्यामुळे अधिक काळजी वाटते.

संध्यासमयी सावली साथ सोडते हा निसर्गाचा कटू नियम आपल्या अनुभवी आला. पण धीर धरा, स्वत: सांभाळा! ह्या शोकाकूल प्रसंगी आम्ही पवार कुटुंबीय आपल्या सोबत आहोत.

या परिस्थितीतून सावरण्याचे आपणास बळ मिळो व सुलोचना वहिनींच्या आत्म्यास ईश्वर चिरशांती देवो ही प्रार्थना!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाधवान प्रकरणी उशिरा का होईना पण शहानपण आले !

News Desk

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पूर्ण केली ६ वर्षीय संचितची इच्छा!

News Desk

संभाजी निलंगेकरांकडून ७६ कोटीचे कर्ज अवघ्या २५ कोटीत सेटलमेंट

News Desk