HW News Marathi
महाराष्ट्र

शिवेंद्रराजे भोसले यांचे मन वळवण्यासाठी शरद पवारांची मध्यस्थी

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजप-शिवसेनेत पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत. तर काही जण पक्षांतराच्या करण्याच्या तयारीत आहेत. यातील साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबत सतत होणाऱ्या वादाला कंटाळून आमदार शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

मात्र, यादोघांमधील वाद निवळावाण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पुढाकार घेऊन यांच्यातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.शिवेंद्रराजे हे राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी गैरहजर राहिल्यामुळे ते पक्ष सोडण्याच्या तयारी असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीत उदयनराजे यांच्याकडून दगा फटका होण्याची भीती असल्यामुळे शिवेंद्रराजे यांना पक्षांतर करण्यापासून रोखण्यासाठी शरद पवार या दोघांमध्ये मध्यस्थी करणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींच्या पहिल्यांदाच मराठीतून गणेश भक्तांना शुभेच्छा!

News Desk

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ शौर्यदिनाचे काटेकोर नियोजन करा; धनंजय मुंडेंच्या सूचना

News Desk

“गुन्हेगारापेक्षाही वाईट वागणूक राणा दाम्पत्यांना दिली,” फडणवीसांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

Aprna