HW News Marathi
महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख तर आता निलेश लंके म्हणतात…..

अहमदनगर। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला. यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे.तर आता पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. आणि याबरोबरच बोलताना जरा भान बाळगण्याचा सल्लाच आता राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी चंद्रकांत पाटलांना दिला.

पवारांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं

पवार साहेब हे देशाचे ज्येष्ठ आणि आदरणीय नेते आहेत. देशावर आणि राज्यावर आलेल्या प्रत्येक संकटात शरद पवार धावून गेले आहेत. मग गुजरातमधील भूकंप असो, किल्लारीचा भूकंप असो, कोल्हपूर सांगलीला आलेला महापूर असो… प्रत्येकवेळी शरद पवार मदतीसाठी पुढे आले आहेत. तर हा एकेरी उल्लेख केल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं होतं. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यापर्यंत सर्वच नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांना टार्गेट केलं होतं. चंद्रकांत पाटलांवर चौफेर टीका झाल्यानंतर आता चांगलेच चर्चेत आले आहेत.

अपेक्षाभंग झाल्या की दुःख होणं साहजिकच असतं

रोहित पवार यांनी सोशल मीडियात पोस्ट लिहून भाजपच्या नेत्यांना उत्तर दिलं आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘अपेक्षाभंग झाला की दुःख होणं साहजिकच असतं आणि ते दुःख, ती सल कायम मनाला हतबल करते आणि ही हतबलता सहन न झाल्यास काहीजण मग तोल ढळल्यासारखं बडबडतात. असंच भाजपच्या नेत्यांचं झालं आहे. ५० वर्षांहून अधिक काळ संसदीय राजकारणात काम करणाऱ्या शरद पवार यांचा भाजपचे काही स्वयंघोषित वरिष्ठ नेते एकेरी उल्लेख करू लागले यात त्यांची चूक नाही, तर हे सत्ता जाण्याचं दुःख आहे आणि ते समजू शकतो, परंतु या पातळीपर्यंत दुःख होईल ही अपेक्षा नव्हती,’ असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

त्यांच्याबद्दल माझ्या मनात अनादर नाही

पवार साहेब विरोधक जरी असले तरी त्यांच्याबद्दल माझ्या मनात अनादर नाही. आमचा काही एकमेकांच्या बांधाला बांध नाही. उलट प्रमोद महाजन आम्हाला सांगायचे. मुख्यमंत्री होताना पवार साहेबांनी 40 गोष्टी लिहून काढल्या. त्यातल्या 38 पूर्ण केल्या,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्र सरकार हे परदेशातील सरकार नाही, राजकारणाचा चिखल कुणी एकमेकांवर उडवू नये –  मुख्यमंत्री

News Desk

राम कदम यांना जनआक्रोश आंदोलनापुर्वीच पोलिसांनी घेतले ताब्यात

News Desk

‘सत्ता गेल्यावर काही लोक भ्रमिष्ट होतात तर काहींचा तोल जातो, त्यामुळे…

News Desk