Site icon HW News Marathi

मुख्यमंत्र्यांनी ‘या’ नेत्यांची जिल्हा संपर्कप्रमुख पदावरुन केली हक्कालपट्टी; शिंदे गटात अंतर्गत कलह

मुंबई | शिंदे गटाचे नेते गोपीकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) यांना संपर्कप्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्या जागी खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे बुलढाणा लोकसभेसह अकोला लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पक्षासोबत बंडखोर केल्यानंतर राज्यात शिंदे-भाजपचे सरकार स्थापन झाले. यानंतर शिंदे गटाने त्यांच्या पक्षातील गोपीकिशन बाजोरिया यांना हक्कलपट्टी केल्याची ही पहिली कारवाई केली आहे.

 

बाजोरिया यांची अकोला लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुख पदाची नियुक्ती केल्यापासून वाद झाले. अकोल्यतील शिंदे गट आणि ठाकरे गटातील दररोज वादांची चर्चा. एका गटाच्या दुसऱ्य गटाच्या पदाधिकाऱ्याच्या घरी तोडफोड अन् हल्ल्याच्या प्रयत्नाचा प्रकार घडला. अकोल्यात बाजोरिया यांच्या विरुद्ध दोन जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप, अश्विन नवलेंसह  युवासेना जिल्हाप्रमुख आणि इतर पदाधिकारी असा वाद आहे. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप यांच्या गोरक्षक मार्गावरील सहकारनगर भागातल्या घरी तोडफोड झाली. याविरोधता सरप यांनी शहरातील खदान पोलिसांत बाजोरियांचे खठ्ठर समर्थक असलेल्या उपजिल्हाप्रमुख योगेश बुंदेलेंसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या हल्ल्यामागे बाजोरिया असल्याचे आरोप सरप यांनी केला.  शिंदे गटातील अंतर्गत वाद मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत पोहोचला. या पार्श्वभूमी मुख्यमंत्र्यांनी बाजोरियांना हक्कालपट्टी केल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

गोपीकिशन बाजोरिया यांच्यावर ‘कमिशन एजंट’ असा उल्लेख असलेली तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. यानंतर अकोला जिल्ह्यात संपर्कप्रमुख पदावरून हकालपट्टी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी बाजोरियांना दिलेला १५ कोटी आणि २० कोटींचा विकासनिधी बाजोरिया यांनी ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला विकल्याचा गंभीर आरोप या पत्रातून करण्यात आला.

 

 

 

 

Exit mobile version