HW News Marathi
महाराष्ट्र

लोकसभा निवडणूक शिवसेना स्वबळावर लढवणार

मुंबई | शिवसेना २०१९ची लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्वच म्हणजे ४८ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीव मोर्चेबांधणीला सुरू झाली आहे. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज सेना भवनात एका बैठक बोलवण्यात आली होती.

येत्या गणेशोत्सवाच्या आधी शिवसेना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिवसेनेने आतापासूनच चाचपणीला सुरुवात केली आहे. मुंबईत लोकसभेचे ६ सहा मतदारसंघ आहेत. तसेच शिवसेनेच्या विद्यमान 18 खासदारांना पुन्हा संधी मिळणार आहे. भाजपा नेते आणि खासदार किरीट सोमय्यांना पराभूत करण्यासाठी शिवसेना रणनीती आखणार आहे.

मुंबईत एकूण सहा खासदार असून तीन खासदार शिवसेनेचे आहेत. तर तीन खासदार भाजपचे आहेत. दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे आणि उत्तर पश्चिम मुंबईतून गजानान कीर्तीकर यांना पुन्हा एकदा संधी मिळू शकते. या बैठकीत महापौर विश्वनाथ महाडेश्वर, माजी महापौर शुभा राऊळ आणि नीलम गोऱ्हे आदी मान्यवर उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हसन मुश्रीफ यांचा आणखी एक घोटाळा उघड करणार, सोमय्यांचं वक्तव्य!

News Desk

“…मोठं काहीतरी केल्याचा टेंभा मिरवू नका”, आशिष शेलारांचा राज्य सरकारवर निशाणा!

News Desk

“बुस्टर डोस मला माहित नाही पण, हा मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असेल”, राऊतांचा भाजपला टोला

Aprna