HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना भाजपात आता वाक युद्ध 

मुंबई – भाजप आणि शिवसेना सत्तेत एकत्र असले तरी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्याला काही तरी निमित्त असावे लागते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा उल्लेख न करता कपटी मित्रा पेक्षा दिलदार शत्रु कधीही बरा असा टोला लगावला होता. त्याला शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री शिवसेनेच्याच मनातले बोलले त्यामुळे त्यांचे धन्यवाद मानत त्यांनी जय महाराष्ट्र केले आहे. त्यांनी आपली ही भावना ट्वीटर द्वारे व्यक्त केली आहे. त्यांचा बोलण्याचा रोख हा भाजपकडे होता. मुख्यमंत्र्यांनी शिवसेना हा कपटी मित्र असल्याचा उल्लेख करून सेनेला डिवचले. तीच संधी शिवसेनेने साधत कपटी मित्र कोण हे राऊत यांनी आपल्या ट्वीटरच्या माध्यमातून दाखवून दिले. नुकतेच अमरावती येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सर्वपक्षीय सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांचे कौतूक केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारनं हाती घ्यावा, प्रश्न एका तासात निकाली लागू शकतो!

News Desk

“या PI लगडचा बाप कोण आहे, ते आम्ही शोधून काढू”, चित्रा वाघ कडाडल्या 

News Desk

“तर ते राज्याचं दुर्भाग्य आहे”, सुधीर मुनगंटीवारांनी दर्शवली नाराजी

News Desk