HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना खासदाराला पडला उद्धव ठाकरेंचाच विसर, म्हणाले, ‘मुख्यमंत्री माननीय अशोक चव्हाण साहेब!’

सिंधुदुर्ग।शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत बोलता बोलता चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच विसरून गेले. विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री म्हणून थेट काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचं नाव घेतलं आहे.सध्या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे ते आघाडी सरकार सत्तेवर आले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे. बऱ्याच वेळा बोलण्याच्या ओघामध्ये कुठल्या पक्षाचा कोणता मंत्री आहे? त्याकडे कोणते पद आहे. याचेही भान बोलताना राहत नाही. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खासदार आणि शिवसेना सचिव असलेले विनायक राऊत यांच्या बाबतीत असाच प्रकार घडला आहे.

अशोक चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख केला

माध्यमांशी बोलताना त्यांनी ओघात अशोक चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख केला. रस्ते विकासाच्या कामासंदर्भात त्यांनी पत्रकारांना माहिती देताना, “या रस्त्यांसंदर्भात आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे बाजू मांडलेली आहे. त्यांनीही तत्वत: मंजूरी दिलेली आहे आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत”, असं विनायक राऊत म्हणाले.

विनायक राऊतांच्याही लक्षाच आलं नाही

विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांचा उल्लेख मुख्यमंत्री असा केल्यानंतरही त्यांच्या आजूबाजूला उपस्थित असणाऱ्यांच्याही हा संबंधित प्रकार लक्षात आला नाही. राऊत रस्तेकामासंदर्भात पुढची माहिती देतच राहिले. पण आपण काही वेळापूर्वी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंऐवजी अशोक चव्हाण यांचं नाव घेतलंय, हे विनायक राऊतांच्याही लक्षाच आलं नाही.स्वतःच्या पक्षातील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्याचा विसर विनायक राऊत यांना पडल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता मराठ्यांच्या गनिमी कावा आंदोलन

News Desk

“… तर सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांच्या भन्नाट डान्सवर विखे पाटलांचा हल्लाबोल”

News Desk

गरोदर महिला आणि डायलिसीसच्या रुग्णांच्या प्रश्नावर फडणवीसांची सरकारला विनंती

News Desk