HW News Marathi
मनोरंजन

“शेतकऱ्यांनी हे स्वातंत्र्य लढून मिळविलं, भीक मागून नाही!”, राऊतांचा कंगना-गोखलेंना टोला

मुंबई | “शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र दिनच आहे. आणि हे स्वातंत्र शेतकऱ्यांनी लढून मिळविलं. भीक मागून मिळविलेलं नाही,” असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना रनौत आणि अभिनता विक्रम गोखले यांना लगावला. “शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आज स्वातंत्र्यांची पहाट होती,” असे मतही राऊतांनी आज (२० नोव्हेंबर) नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणालं. “गेल्या दीड वर्षापासून शेतकरी तणाव आणि दहशतीखाली होते. आता ते वातावरण संपलं आहे. या कायद्यानुसार शेतकरी हा त्यांच्या शेतीचा मालक नसून गुलाम बनविणार हा कायदा होता,” असे मत राऊतांनी व्यक्त केले.

“कृषी कायदा हा नव्या प्रकारची जमिनदारी सरकारनं देशात लादली जाणार होती. इस्ट ईडीया कंपनी जशी देशात घुसली आणि देशाला पारतंत्रात टाकला. त्यापद्धतीनं नव्या भांडवल दारांना इस्ट ईडीया कंपनीनं शेतकऱ्यांच्या जमिनीवर कबजा करण्यासाठी हा नवीन कायदा आणला. आणि या देशातील शेतकऱ्यांनी दीड वर्ष एकजुटीनं ऊन, वारा, पाऊस, रक्त आणि बलिदान मंत्र्यांनी त्यांना गाडीखाली चिरडलं, तरी देखील हार न मानता शेतकरी कायद्याविरोधात लढत राहिलं,” असे राऊत शेतकऱ्यांशी बोलताना म्हणालं.

स्वातंत्र शेतकऱ्यांनी लढून मिळविलं

राऊत पुढे म्हणालं, “तसेच पोलिसांनी गोळीबार केला, भाजपच्या नेत्यांनी हरियाणाच्या रस्त्यावर गुंडे पाठवली. पण पंजाब आणि हरियाणाचा शेतकरी तरीही मागे हटलं नाही. हे शेतकरी फक्त दोन राज्याचं नव्हतं. हे दोन राज्याचं शेतकरी देशातील शेतकऱ्यांचं प्रतिनिधीत्व करत होतं. म्हणून शेवटी शेतकऱ्यासमोर सरकारला झुकावं लागलं. कृषीविषयक तीन काळे कायदे रद्द होतात. हा शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र दिनच आहे. आणि हे स्वातंत्र शेतकऱ्यांनी लढून मिळविलं. भीक मागून मिळविलेलं नाही. आणि ७०० शेतकऱ्यांनी बलिदान दिले आहे. जेसे जलियांवालामध्ये ब्रिटिशांनी आमच्या वीरांना चिरडलं. त्याच पद्धतीनं लखीमपूरमध्ये सुद्धा या ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांनी शेतकऱ्यांना चिरडून मारलं. म्हणून मला आजची सकाळी ही मला शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यांची सकाळ वाटतं.

 

 

Related posts

असा महात्मा होणे नाही…

swarit

ख्रिसमस ट्री हे स्वर्गातल्या ईडन बागेतील झाड !

News Desk

सिध्दार्थ जाधवने केली बीडच्या ८५ अनाथ मुलांना मदत

News Desk