HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची संपत्ती ED कडून जप्त

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची अलिबागमधील संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ईडी अलिबागमधील ८ भूखंड आणि दादरमधील फ्लॅट जप्त केला आहे. ईडीने राऊत आणि त्यांच्या मंत्रिपरिवारची जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. १ हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने राऊतांवर कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे. “ईडीने माझे राहते घर जप्त केले असून ईडीने जप्त केलेल्या फ्लॅटमध्ये माझे कुटुंब राहत आहे. मनी लॉन्ड्रिंगमध्ये माझा १ रुपया जरी सापडला तर माझी संपत्ती भाजपला दान करेन,” ईडीच्या कारवाईनंतर राऊतांनी प्रसार माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली. 

यापूर्वी राऊतांनी ईडीवर आरोप करत म्हणले, “ईडी ही भाजपची एटीएम मशी बनली आहे. “ईडीने १ हजार ३४ कोटी पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी कारवाई केली असून यापूर्वी राऊतांचे नातेवाईक प्रवणी राऊत यांना या प्रकरणात अटक केली आहे. या प्रकरणात आठवड्यापूर्वीच आरोपपत्र दाखल केले आहे. राऊतांची मुलीच्या कंपनी भागीदार असेलला सुजित पाटकर यांच्या घरावरही ईडीने छापेमार केली होती. राऊतांची पत्नी वर्षांनी पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली होती. या प्रकरणी त्यांची चौकशी देखील झाली होती. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मागच्या 5 वर्षांमध्ये भोंगे नव्हते का आणि तेव्हा अजान होत नव्हते का?, भाई जगतापांचा राज ठाकरेंना सवाल

Aprna

पारस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांकडून 4 लाखांची मदत जाहीर

Aprna

काँग्रेसनंतर राष्ट्रवादी निर्णय देणार | नवाब मलिक

News Desk