HW News Marathi
महाराष्ट्र

आदित्य ठाकरे यांनी घेतली कॅबिनेट मंत्री पदाची शपथ

मुंबई | ठाकरे घराण्यातील निवडणूक लढविणारा पहिला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आहे. आदित्य ठाकरे हे मुंबईतील वरळी मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले आहेत. तसेत शिवसेना पक्ष पिता मुख्यमंत्री आणि पुत्र मंत्री असे उदाहरण महाराष्ट्राच्या राजकारणात कदाचित पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे.

ठाकरे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळचा विस्तार विधान भवनात आज (३० डिसेंबर) शपथ विधीसोहळा पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी आदित्य यांना मंत्रिपदाची शपथ दिली. यावेळी शपथविधीसाठीचा मायना वाचत असताना त्यांनी आपल्या आईचेही नाव घेतले. ठाकरे कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाच्या अशा या क्षणी आदित्य ठाकरे यांच्या आई, रश्मी ठाकरे आणि भाऊ तेजसचीही उपस्थिती होती.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रविकांत तुपकरांसह शेतकऱ्यांनी केली दुधाने अंघोळ

News Desk

“छोट्या छोट्या गोष्टींवर बोलणारे आता गृहमंत्री कुठे आहेत?”

News Desk

वैद्यकीय गुन्ह्यांच्या तपासासाठी स्वतंत्र पोलीस विभाग स्थापनचा विचार करा, हायकोर्टाची राज्य सरकारला सूचना

News Desk