HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेचे हिंदुत्व हे भेंडीबाजारातले; सामनाच्या अग्रलेखावरून नितेश राणेंची टीका

मुंबई | सामनाच्या अग्रलेखातून अयोध्या जमिन घोटाळ्यावरून शिवसेनेने भाजपच्या हिंदुत्ववादावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. सामनाच्या अग्रलेखाचे पडसात आज (२३ डिसेंबर) विधिमंडळात देखील पडलेले पाहायला मिळाले आहे. “भाजपचे हिंदुत्व चोरबाजार आहे ना, मग शिवसेनेचे हिंदुत्व हे भेंडीबाजारातले आहे. पहिले भेंडीबाजाराच्या हिंदुत्वातून शिवसेनेने बाहेर पडावे, असा टोला भाजप आमदार नितेश राणे यांना शिवसेनेला लगावला आहे. आणि मग आमच्या हिंदुत्वावर बोलावे. अग्रलेखात म्हटले अयोध्यातील सर्व जमिनी भाजपने विकत घेतल्या, पहिले शिवसेनेने ठरवावे. ते हिंदुत्वाच्या बाजुने आहेत की धर्मनिरपेक्षतेच्या बाजुने आहेत. कधी त्यांना धर्मनिरपेक्षते पाहिजे कधी ते हिंदुत्वाच्या बाजुने जातात.” 

“मुख्यमंत्र्यांनी हातात मिस्टर इंडियाचे घड्याळ घातले आहे. मुख्यमंत्री ते घड्याळ काढाला सांगा लगेच ते आपल्या दिसतील, अशी टीका राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे. आजू-बाजुला असतील इकडे कुठे तरी, असे ते म्हणाले. राणेंनी आज  विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांच्या यांच्या अनुपस्थितीवर टीका केली आहे.दरम्यान, मुख्यमंत्री घड्याळ कधी काढतील, असा सवाल पत्रकारांनी राणेंना विचारल्यावर ते म्हणाले. “घट्याळ लावयाचे कसे, कुठे किंवा लावायचे नाही किंवा आदित्य ठाकरेंसारखे दोनदोन घालयाचे हा त्यांचा प्रश्न आहे माझा प्रश्न नाही. पण राज्याच्या जनतेला आम्हा लोकप्रतिनिधींना मुख्यमंत्री दिसत नसेल. मग राज्याचा कारभार कसा चालवायाच यांचे तरी आम्हाला उत्तर द्या. कोण चालवतय कारभार, कोण घेते अधिवेशन, कोण उत्तर देतय आमदारांना म्हणजे सगळे हवेत चालेल की काय?, असे अनेक प्रश्न राणेंनी उपस्थित केले आहे. राणे पुढे म्हणाले, “चार्ज देण्याची हिम्मत नाही, ऐवढा विश्वास नाही. तुम्हाला अध्यक्ष पदाची निवडणूक घ्याची नाही. स्वत:चा चार्ज द्याचा नाही. म्हणजे काहीच करायचे नाही. राज्यला आयसीयूमध्ये टाकायचे की काय ?”

शिवसेनेने हिंदुची माफी मागावी

“माझ्या ट्वीटमुळे शिवसेनेच्या भावना दुखावल्या असतील. तर पहिल्या हिंदुच्या ज्या भावना शिवसेनेमुळे दुखावल्या आहेत. त्यांनी पहिल्या हिंदुची माफी मागावी,. माझ्या ट्वीटमुळे त्यांच्या भावना दुखावल्या त्यांच्या आधी त्यांच्यामुळे हिंदुच्या भावना दुखावल्या आहेत. शिवसेनेचे जर हिंदुची माफी मागीतली तर मी शिवसेनेची माफी मागायला तयार आहे. त्यांच्या आधी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. कारण का मी ते ट्वी का केले. हे महत्व तुम्हाला कळाले पाहिजे, पहिल्यांदा शिवसेनेने समस्त हिंदुची माफी मागावी. मग माझ्याविरोधात पोलिसात जावे,” राणेंच्या ट्वीट व्हायरल झाले असून शिवसेना यासंदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार पत्रकारांच्या या प्रश्नावर उत्तर देना ते म्हटले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नीट चालू नये अशी दिल्लीतील काही लोकांची इच्छा दिसते 

News Desk

दिव्यांगांकडून नाकर्त्या शिवसेना-भाजप सरकारला बांगड्यांचा आहेर – दिव्यांग सेना

News Desk

सामाजिक न्याय विभागाच्या प्रभावी कामगिरीसाठी कायदा करणार असल्याची धनंजय मुंडेंची माहिती!

News Desk