HW News Marathi
महाराष्ट्र

हितेंद्र ठाकूरांना भिडणाऱ्या बड्या नेत्याची शिवसेनेतून काँग्रेसमध्ये घरवापसी

वसई | महाविकास आघाडीतील नेत्याने एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याचा सपाटा सुरुच आहे. वसईतील नेते विजय पाटील यांनी शिवसेनेला रामराम ठोकत पुन्हा काँग्रेसचा झेंडा हाती धरला आहे. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात विजय पाटील यांनी गेल्या वेळी विधानसभा निवडणूक लढवली होती.

शिवसेनेला रामराम करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या उपस्थित विजय पाटलांनी काल पक्ष प्रवेश केला आहे. विजय पाटील यांची दोन वर्षांतच काँग्रेसमध्ये घरवापसी झाली आहे. विजय पाटील यांनी याआधी काँग्रेसचे राज्य सचिवपद भूषवले आहे. मात्र २०१९ मधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सप्टेंबर २०१९ मध्ये पाटील यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवबंधन हाती बांधले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला उपमुख्यमंत्र्यांच्या खास शुभेच्छा!

News Desk

भाजप, व्यापारी संघटनांनंतर मनसेचाही महाराष्ट्र बंदला विरोध

News Desk

मुंबईतलं निर्भया बलात्कार कांड, मुख्यमंत्र्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना 5 मोठ्या सुचना!

News Desk