HW News Marathi
महाराष्ट्र

पक्षातून बाहेर पडलो अन् माझ्या नावाचा जपच सुरु झाला !

सातारा | “गेली १५ ते २० वर्षे मी राष्ट्रवादीत आमदार म्हणून काम केले. त्यावेळी पक्षातील नेत्यांना क्वचीतच माझी आठवण यायची. मात्र, आता मी पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी माझ्या नावाचाच जप सुरू केला आहे”, असे म्हणत शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. काहीच दिवसांपूर्वी शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यानंतर, राष्ट्रवादीकडून अनेकदा शिवेंद्रराजेंवर टीका करण्यात आली. नुकतीच जयंत पाटील यांनी देखील शिवेंद्रराजेंवर टीका केली आहे.

मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची बोचरी टीका जयंत पाटील यांनी केली होती. याच टीकेला प्रत्युत्तर देताना शिवेंद्रराजे म्हणाले कि, “मला मंत्रीपद हवे असते तर गेल्याच निवडणूकीत पक्ष सोडला असता. मी लोकसभेला पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले. आता माझी निवडणूक असल्याने मी पक्षातून बाहेर पडलो आहे. याचा अर्थ असा होत नाही कि मी मंत्रीपदासाठी बाहेर पडलो. मी राष्ट्रवादीत होतो तेव्हाही प्रामाणिकपणे काम केले. आता भाजपमध्ये देखील प्रामाणिकपणेच काम करणार आहे”, असेही शिवेंद्रराजे यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाविन्यपूर्ण रीतीने व कालानुरूप सकारात्मक बदल करून राबवत गरजूंना लाभ देण्याचे नियोजन – धनंजय मुंडे

Aprna

पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा मोहन डेलकरांचे प्राण वाचवू शकले असते ! – सचिन सावंत

News Desk

जनगणना केल्यावरच ओबीसींना न्याय मिळेल, विजय वडेट्टीवारांनी केल्या ‘या’ तीन मागण्या

News Desk