HW News Marathi
महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज मनामनात, राज्याभिषेक घराघरात !

रायगड | आज (६जून) शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर दरवर्षी प्रमाणेच साजरा होत आहे. मात्र, यंदा कोरोनाच्या संकटामुळे शिवभक्त रायगडावर थेट जाऊन हा सोहळा अनुभवू शकत नाही आहेत. मात्र, खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी एकच धून सहा जून असं म्हणत दरवर्षी प्रमाणे रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यास सुरुवात केली आहे . ९ वाजता या सोहळ्याला सुरुवात होणार आहे.

मात्र, यंदा या सोहळ्यावर कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे यंदाचा शिवराज्याभिषेक घरीच राहुन साजरा करण्याचे आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे. त्यांनी फेसबुक वरून एक पोस्ट देखील शेअर केली आहे. ज्यात त्यांनी, तोच जोश, तोच उत्साह, तोच क्षण पुन्हा अनुभवायचा आहे, पण आपल्या गडातून म्हणजे आपल्याच घरातून.

शिवराज्याभिषेक सोहळ्याची दरवर्षीची रायगडावरील लगबग तुम्ही सर्वजण सकाळी पाहण्यासाठी आतुर असाल म्हणूनच सकाळी ९ वाजता गतवर्षीचा शिवराज्याभिषेक सोहळा दाखवला जाणार आहे.

मी समजू शकतो मी केलेल्या आवाहनाला तुम्ही सर्वांनी प्रतिसाद दिला आहे. सध्या दोन दिवस कोकणात चक्री वादळाने थैमान घातले असून रायगड जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडित झालेला आहे. मोबाईल टॉवर सुद्धा पडले आहेत. परिसरात रेंज कमी प्रमाणात असल्याने तुम्हाला सोहळा दाखवण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करत आहोत.पण माझा शब्द आहे ६ जून २०२० शिवराज्याभिषेक सोहळा तुम्ही घरातुन नक्की पहाल.

छत्रपती शिवाजी महाराज मनामनात, राज्याभिषेक घराघरात! अशी पोस्ट त्यांनी केली आहे

आणि प्रत्येक शिवभक्ताला हा सोहळा घरात राहून अनुभवता येणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशातील पहिल्या वॉटर टॅक्सीसेवेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

News Desk

“गरीब मराठा समाजाला न्याय देण्याची वेळ आली आहे”, संभाजीराजेंची भूमिका

News Desk

उस्मानाबाद जिल्ह्यात सव्वा कोटी रुपयांचा‌ 47 पोती गांजा जप्त‌; चौघे‌ तस्कर फरार

News Desk