HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

आ. महेंद्र दळवींच्या नेतृत्वात रायगड जिल्ह्यातील पेण मधील शिवसैनिक शिंदे गटात सामील

राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथ होऊन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतून पायउतार झाले, तर महाविकास आघाडीमधील तत्कालीन नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शिंदे गट व भाजप असे संयुक्तिक सरकार सत्तास्थानी विराजमान झाले. शिवसेनेचे 40 आमदार व 12 खासदार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. रायगड जिल्ह्यात देखील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात सामील झाले . शिवसेना पेण तालुकाप्रमुख तुषार मानकवळे सहकाऱ्यांसह शिंदे गटात सामील झाल्याने आमदार महेंद्र दळवी व युवा नेते राजा केणी यांनी सर्वांचे स्वागत केले. जिल्ह्यात शिंदे गट संघटनात्मकदृष्ट्या अधिक बलाढ्य व्हावा यासाठी आमदार महेंद्र दळवी, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे हे तिन्ही आमदार जोमाने सरसावले आहेत.

यावेळी महेंद्र दळवी म्हणाले की रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते येत्या काही दिवसात शिंदे गटात सामील होतील, तुषार मानकवळे हा कट्टर समर्थक व हृदयातील कार्यकर्ता आहे, त्यांनी आज सहकाऱ्यांसह शिंदे गटात प्रवेश केला, येत्या काळात अधिक समाधानकारक चित्र पहावयास मिळेल असा विश्वास आ.दळवी यांनी व्यक्त केला.तुषार मानकवळे यांनी सांगितले की आ. महेंद्र दळवींच्या नेतृत्वात शिवसेना पक्ष वाढीसाठी तन, मन, धनाने झोकून काम केले, मात्र आजमितीस पेण तालुक्यात मोठी गटबाजी उफाळून आली. त्यामुळे काम करणे कठीण झाले, शिवसेनेचा प्रशासन दरबारी वचक राहिला नाही, म्हणून पक्ष संघटना मजबुतीसाठी व विकासात्मक दृष्ट्या आ. महेंद्र दळवी यांच्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे आम्ही शिंदे गटात सामील झालो आहोत. असे मानकवळे यांनी सांगितले. यावेळी आ.महेंद्र दळवी, युवा नेते राजा केणी, तुषार मानकवळे, धीरज पाटील, आशिष वर्तक, शैलेश पाटील, दीपक चरवट, विकी मानकवळे, राहुल पाटील, सरिता पाटील,सुशांत घाडगे, हर्षद पाटील आदी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापूरमधून निवडून येणार होतात तर… छगन भूजबळांची पाटलांना कोपरखळी

News Desk

तळीये मधल्या मृतांची संख्या ८४, शोधमोहीम थांबलं

News Desk

“RSS चं प्रशिक्षण घेणारे अधिवेशनात ब्ल्यू फिल्म्स पाहतात, शिकण्यासारखं काय?”, बड्या नेत्याची टीका

News Desk