HW News Marathi
महाराष्ट्र

सातारच्या गादीचा अपमान सहन करणार नाही,उदयनराजेंच्या समर्थनार्थ शंभूराजे मैदानात !

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले यांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ‘बिनडोक’ म्हटल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते आणि गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकरांनी केलेले वक्तव्य नींदनीय आहे. त्याची जितकी नींदा करावी तितकी कमी आहे. छत्रपतींच्या घराण्याला आणि गादीला महाराष्ट्रातली जनता वंदन करत आहे. त्यामुळे हे वक्तव्य चुकीचे आहे असे म्हणतं उदयनराजेंच्या समर्थनार्थ शिवसेना नेते मैदानात उतरले आहेत.

पुढे देसाई असे म्हणाले की, “दोन्ही छत्रपतींनी आरक्षणाच्या संदर्भामध्ये साताऱ्याच्या आणि कोल्हापुरच्या गादीने आणि त्यांच्या प्रमुखांनी मराठा आरक्षणासंदर्भातील त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. असे असताना आंबेडकरांनी छत्रपतींच्या वंशजावर अशी टीका करणे हे गैर आहे. आम्ही सातारकर म्हणून किंवा छत्रपतींना मानणारे मावळे म्हणून छत्रपतींच्या वारसदारावरती अशा प्रकरची केलेली टीका सहन करणार नाही. आणि प्रकाश आंबेडकरांना इतकेच सांगणे आहे की आरक्षणासंदर्भातील त्यांची भूमिका त्यांनी मांडावी आणि मराठा समाज आपली भूमिका ठामपणे मांडेल. शासनाकडे त्याबद्दल बोलणे सुरु आहे. अशात आंबेडकर असं का बोलले माहीत नाही. परंतू सातारच्या गादीचा अशा प्रकारे केलेला अवमान आम्ही सहन करणार नाही”.

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?

“दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे, कुठे वाचनात आलं नाही. एक राजा तर बिनडोक असल्याचे मी म्हणेन, तर दुसरे संभाजीराजे यांनी आरक्षणाबद्दल घेतलेली भूमिका बरोबर आहे. पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर अधिक भर देत असल्याचं मला दिसत आहे. ज्या माणसाला राज्य घटना माहिती नाही. ‘आम्हाला आरक्षण मिळाले नाही, तर सर्वांचे आरक्षण रद्द करा’, अशी ते भूमिका मांडतात. त्यावरून भाजपनं राज्यसभेवर कसे पाठवले? याचंच मला आश्चर्य वाटतं,” असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजे यांच्यावर निशाणा साधला आहे. “मी कोणालाही अंगावर घेण्यास घाबरत नाही,” असंही ते म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रकांत पाटलांनी संभाजीराजेंना उपकाराची आठवण करुन दिली – संजय राऊत

News Desk

महाविकास आघाडीचे नेते आणि राज्यपालांची भेट रद्द!

News Desk

डीएसकेच्या मुलाच्या अटकपुर्व जामीन अर्जाला हायकोर्टाचा नकार

News Desk