HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना शोधतेय रामदास कदम यांना पर्याय?

मुंबई | रामदास कदम यांची कथीत ऑडीओ क्लीप व्हायरल झाल्यावर शिवसेनेत मोठे वादंग उठले. आमदार रामदास कदम यांच्याबद्दल सध्या शिवसेनेत नाराजीची भावना आहे. याचा फटका त्यांना विधान परिषद निवडणुकीच्यावेळी बसण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांना अडचणीत आणण्यामागे रामदास कदम असल्याचे बोलले जात आहे. रामदास कदम यांनीच किरीट सोमय्यांना अनिल परब यांच्याविरोधात रसद पुरवली, असा आरोप मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी केला होता.

नेमकं प्रकरण काय?

किरीट सोमय्यांनी महाविकासआघीडीच्या नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर आणल्यानंतर त्यांना आतली माहिती कोण पुरवतं यावर चर्चा सुरू असतानाच एक ऑडीओ क्लिप समोर आली.

या प्रकरणात एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. अलीकडेच झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे निमंत्रण रामदास कदम यांना देण्यात आले नव्हते.. निमंत्रण देण्याचे टाळले, त्यामागे कोरोना नियम, ५० टक्के उपस्थितीचे कारण देण्यात आले होते. खरंतर रामदास कदम हे शिवसेनेतील वरिष्ठ नेते आहेत. शिवसेनेकडून त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद भूषवले. फडणवीस सरकारमध्ये ते मंत्री सुद्धा होते. त्यामुळे इतक्या वरिष्ठ नेत्याला दसरा मेळाव्याला न बोलावल्याने राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सहाव्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या

News Desk

वीज कोसळून एकाच कुटुंबातील ६ जणांनी गमावले प्राण

swarit

राज्य वीज नियामक आयोगाने सरकारच्या तिजोरीवरील भार केला कमी

swarit