HW News Marathi
महाराष्ट्र

सरनाईकांच्या लेटरबॉम्बनंतर आता शिवतारेंचेही मुख्यमंत्र्यांना पत्र, काँग्रेस आमदारावर केले गंभीर आरोप

पुणे | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटर बॉम्बमुळे खळबळ उडाली असतानाच वातावरण नीट निवळलेलं नसताना आता शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनीही काँग्रेस आमदारावर टीकास्त्र सोडलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात शिवतारेंनी गंभीर आरोप केले आहेत. विजय शिवतारे यांनी पुणे जिल्ह्यातील पुरंदर हवेली मतदारसंघाचे आमदार संजय जगताप यांच्यावर श्रेयवादाचा आरोप केला आहे.

विजय शिवतारे यांच्या पत्रात काय आहे?

पुरंदर तालुक्यातील गुंजवणी धरणाच्या उद्घाटनावरुन विजय शिवतारे यांनी काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे. “राज्यमंत्रिपदाच्या काळात मोठ्या मेहनतीतून मी पुरंदर, भोर आणि वेल्हा या तीन तालुक्यांना वरदान ठरणारे गुंजवणी धरण पूर्ण केले. मी पुरंदर तालुक्यातही जलवाहिनीच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र, या कामात सातत्याने अडथळे आणण्याचे काम कॉंग्रेसचे स्थानिक आमदार संजय जगताप यांच्याकडून केले जात आहे. तोंडल येथे काम सुरु केल्यानंतर अधिकाऱ्यांना धमकावत काम बंद करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. कामाचे भूमिपूजन स्वतःच्या हस्ते करावे असा त्यांचा आग्रह असल्याचे समजते” असा गंभीर आरोप माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केला आहे.

शिवतारेंच्या मुलीचा आई-भावांवर आरोप काय आहे?

दरम्यान, माझ्या पित्याची माझ्याच भावांनी संपत्तीच्या लोभापायी दयनीय अवस्था केली आहे, असा आरोप विजय शिवतारे यांची कन्या आणि आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांच्या पत्नी ममता शिवतारे लांडे यांनी वडिलांच्या फेसबुक अकाऊण्टवरुन गेल्याच आठवड्यात केला होता. त्यानंतर, विजय शिवतारे यांच्या पत्नी मंदाकिनी शिवतारे यांनी मुलगा विनय शिवतारे यांच्या फेसबुक अकाऊण्टवरुन लाईव्ह येत लेकीचे आरोप फेटाळले. मुलगी ममता यांनी मुलगा विनय आणि विनस यांच्यावर केलेले आरोप धादांत खोटे आहेत. वास्तविक गेल्या 27 वर्षांपासून माझे पती विजय शिवतारे कुटुंबापासून अलिप्त राहत होते. पहिली पाच वर्ष एका महिलेसोबत लग्न करुन राहत होते. त्यानंतर आजतागायत दुसऱ्या महिलेसोबत पवईला राहत आहेत, असा दावा मंदाकिनी यांनी केला होता. मुळे शिवतारे कुटुंबातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता.

प्रताप सरनाईकांच्या पत्रात काय आहे?

अवैध मालमत्ता प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानी पत्र लिहिले आहे . या पत्रामुळे महाविकास आघाडी आणि शिवसेनेत खळबळ उडाली आहे . या पत्रात आमदार प्रताप सरनाईक यांनी केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडून होत असलेल्या त्रासामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपशी युती करावी अशी विनंती केली आहे . महाविकास आघाडीतील मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेना पक्ष फोडत आहेत . त्यामुळे भाजपशी युती करावी जेणे करून केंद्रीय सुरक्षा यंत्रणाचा ससोमिरा टाळता येईल ‘ असं प्रताप सरनाईक यांनी या पत्रात म्हटलं आहे.

तुटण्याआधी जुळवून घेतलेलं बरं

पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य पालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलेले बरे होईल. त्याचा फायदा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना आणि भविष्यात शिवसेनेला होईल. साहेब, तुम्ही योग्य निर्णय घ्यालच. माझ्या मनातील भावना तुम्हाला कळवल्या. लहान तोंडी मोठा घास घेतला. काही चुकले असेल तर दिलगिर आहे, असं सरनाईक यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एक जबाबदार विरोधी पक्ष नेते म्हणून मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधणं योग्य

News Desk

निष्काळजीपणाचा बळी!करताना किट अडकलं घशात; अर्धा तास तडफडतच महिलेचा मृत्यू!

News Desk

मुंबई, ठाण्यातील खड्ड्यांच्या राजकारणावरुन चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा!

News Desk