HW News Marathi
महाराष्ट्र

मोठी बातमी! आर्यन खान ड्रग्स प्रकरणाला धक्कादायक वळण, बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रीच्या घरावर NCB चा छापा

मुंबई। बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढला आहे. याप्रकरणी दररोज नवनवे अपडेट समोर येत आहेत. दरम्यान आता या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाल्याचं समोर आलं आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे हिच्या घरावर एनसीबीने गुरुवारी छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, NCB ला क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणात शाहरुखच्या मुलासोबत बॉलिवूडच्या या यंग जनरेशनमधील अभिनेत्रीचेही चॅट आढळून आले आहे. NCB च्या हाती लागलेल्या चॅटमध्ये तो या अभिनेत्रीसोबत ड्रग्जबाबत चर्चा करताना आढळले आहे. एनसीबीने ते पुरावे म्हणून न्यायालयासमोर सादर केले आहे. असेही म्हटले जात आहे की अभिनेत्री क्रूझवर उपस्थित होती आणि सुरुवातीला एनसीबीने तिला जाऊ दिले.

आर्यन खानला भेटण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आता एनसीबीची धडक कारवाई सुरू केली आहे. मुंबईतील अंधेरीत धाडसत्र सुरू आहे. अभिनेता शाहरुख खान त्याचा मुलगा आर्यन खानला भेटण्यासाठी आज म्हणजेच बुधवारी सकाळी आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला होता. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात 3 ऑक्टोबरपासून तुरुंगात आहे आणि काल सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. शाहरुख खानला मुलगा आर्यन खानला मदत करण्यात खूप अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत शाहरुख खान आपल्या मुलाला भेटण्यासाठी आणि त्याची काळजी घेण्यासाठी गुरुवारी सकाळी आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला. यापूर्वी तुरुंगात, कोरोनामुळे समोरासमोर बैठक बंद होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप म्हणजेच हिंदुत्व हे सर्वसामान्य नागरिकांना समजते! – चंद्रकांत पाटील

Aprna

तो दाढीवाला कोण, आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया पार्टीत – नवाब मलिक

News Desk

नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे आपले प्रथम कर्तव्य! – उद्धव ठाकरे

Aprna