HW News Marathi
Covid-19

मुंबईत आजपासून रात्री १० पर्यंत दुकाने खुली राहणार!

मुंबई | मुंबईमध्ये कोरोना रुग्ण कमी होताना दिसत आहेत, त्यानुसार मुंबईमध्ये काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. निर्बंधांबाबत राज्यासाठी सुधारित आदेश जारी करताना सरकारने मुंबईचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावर सोपवला होता. त्यानुसार आपल्या अधिकारात मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी पालिका क्षेत्रासाठी आदेश जारी करत निर्बंधांमध्ये मोठ्या प्रमाणात शिथीलता दिली आहे. नवे आदेश आजपासून(३ ऑगस्ट) लागू केले जाणार आहेत.

काय आहेत नवे नियम?

मुंबईत आता शिथिलतेसाठी सुरुवात झालेली आहे. नवी नियम खालील प्रमाणे आहेत

– सर्व दुकाने आणि आस्थापना आठवड्याचे सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असेल. त्याचवेळी मेडिकल आणि केमिस्ट दुकाने आठवड्यातील सर्व दिवस २४ तास उघडी ठेवता येतील

– सर्व रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स आठवड्याचे सर्व दिवस दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असेल

– जलतरण तलाव आणि निकट संपर्क येऊ शकतो असे प्रकार वगळून अन्य इनडोअर आणि आऊटडोअर खेळांना आठवड्याचे सर्व दिवस नियमित वेळेनुसार परवानगी असेल

– चित्रीकरण नियमित वेळेनुसार करण्यास परवानगी असेल

राज्यातील २२ जिल्ह्यांसाठी निर्बंध शिथील

राज्यातील २२ जिल्ह्यांसाठी निर्बंध शिथील करण्याबाबत जो आदेश जारी झाला आहे त्यात सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजेपर्यंत सर्व दुकाने उघडी ठेवता येणार आहेत तर शनिवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवता येतील व रविवारी जीवनावश्यक वगळता बाकी दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत. मुंबईकरांना याबाबतीत मोठा दिलासा मिळाला आहे. पालिकेच्या आदेशात नमूद केल्यानुसार, मुंबईतील सर्व दुकाने रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. विशेष म्हणजे आठवड्याचे सर्व दिवस दुकाने उघडी ठेवण्याची मुभाही देण्यात आली आहे. मागील दोन आठवड्यांत मुंबई पालिका क्षेत्रात कोविड पॉझिटिव्हिटी रेट १.७६ टक्के इतका असल्याने तसेच ऑक्सिजन बेड व्याप्तीचा सरासरी दर १८.९७ टक्के इतका असल्यानेच ही सूट देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका’, लसीकरणाच्या मुद्द्यावरुन न्यायालयानं केंद्राला फटकारलं

News Desk

जाणून घ्या…पुण्यात आजपासून काय सुरू, तर काय बंद असणार ?

News Desk

कोरोनाने वाचलो अन् महागाईने मेलो…राज्यभर राष्ट्रवादीच्या महिलांचे आंदोलन!

News Desk