HW News Marathi
महाराष्ट्र

गायिका वैशाली माडे करणार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश !

मुंबई | महाराष्ट्रात सध्या अनेक पक्षप्रवेश पाहायला मिळत आहेत. सध्या चित्रपट विश्वातील अनेक कलाकार राजकीय क्षेत्रात उतरताना दिसत आहेत.काही दिवसांपूर्वीच प्रिया बेर्डे आणि मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता.यानंतर आता मराठी चित्रपट विश्वातील प्रसिद्ध गायिका वैशाली माडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणारअसल्याची चर्चा रंगली आहे. याबाबतची माहिती चित्रपट, कला, साहित्य, सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे.

चित्रपट, कला, साहित्य, सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की, लोकप्रिय गायिका वैशाली माडे यांचा 31 मार्चला मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे बडे नेतेही उपस्थित राहणार असून दुपारी 12 वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.

मराठी बिग बॅासमुळे वैशाली माडे चर्चेत

गायिका वैशाली माडे अलीकडेच मराठी बिग बॉसमुळे प्रचंड चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या बातमीमुळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत. वैशाली माडे यांनी आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. तसेच विविध मराठी मालिकांच्या ‘टायटल साँग’लाही त्यांनी आपला आवाज दिला आहे. त्यांच्या आवाजातील टायटल साँग आजही अनेक दर्शकांच्या जीभेवर रेंगाळतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भाजपचा चंचू प्रवेश

Aprna

#CoronaVirus | आता शहरांतील झोपडपट्टी परिसरांतही ‘कोरोना’चा शिरकाव

News Desk

अबू सालेमची पॅरोल तुरुंग प्रशासनाने नाकारली

News Desk