HW News Marathi
महाराष्ट्र

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ‘समृद्ध वृद्धापकाळ’ या चर्चासत्राचे सामाजिक न्याय विभागाकडून आयोजन!

मुंबई। जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून मुंबई येथिल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे ‘समृद्ध वृद्धापकाळ’ या राज्य स्तरीय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले असून सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते या चर्चासत्राचे सकाळी 10.30वा. उद्घाटन होणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षा, आधार, सन्मान, आरोग्य विषयक सुविधा, कौटुंबिक स्वीकार आदी हक्काच्या बाबी मिळाव्यात यासह राज्य शासनाचे ज्येष्ठ नागरिक धोरण, नव्याने प्रस्तावित शरद शतम योजना यांसह ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य सुखकर होण्यासाठीच्या विविध पैलूंवर या चर्चासत्रात चर्चा होणार आहे.

या कार्यक्रमास ना. मुंडे यांच्यासह मुंबईचे पालकमंत्री ना. अस्लम शेख, सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.डॉ. विश्वजित कदम, मुंबईच्या महापौर सौ. किशोरीताई पेडणेकर, खा. अरविंद सावंत, आ. राहुल नार्वेकर, सा.न्या. अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, महात्मा फुले विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांची उपस्थिती असणार आहे.

तर या चर्चासत्रात हेलपेज इंडियाचे प्रकाश बोरगावकर, मुंबईच्या माजी महापौर श्रीमती निर्मला सावंत प्रभावळकर, सा.न्या. विभागाचे उपसचिव दिनेश डिंगळे, फेसकॉम चे उपाध्यक्ष अप्पासाहेब टेकाळे आदी वक्ते सहभागी होणार असल्याची माहिती समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त श्रीमती वंदना कोचुरे यांनी दिली आहे.

या चर्चासत्राच्या माध्यमातून वृद्धापकाळात वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुखकर व समृद्ध व्हावे याबाबत येणाऱ्या सूचना व विविध योजनेतील नियमावली आदींबाबत राज्य सरकार सकारात्मक विचार करेल असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रीय मतदार दिनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून पुरस्कार जाहिर; ठाणे जिल्ह्याला २ पुरस्कार

News Desk

लातूरमध्ये एमआयएमच्या 5 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश!

News Desk

“कर्तबगार, भविष्यवेधी उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या निधनाने हानी”, मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

Aprna