HW News Marathi
Covid-19

सोमय्या म्हणतात -“करुन दाखवलं”, पुढचा नंबर कुणाचा?

दापोली | मिलिंद नार्वेकर यांचा मुरुड दापोलीच्या समुद्र किनारी अलिशान बंगला होता. हा बंगला पाडण्याचे काम आज सकाळपासूनच सुरू करण्यता आले. जेसीबी मशीन लावून हा बंगला तोडण्यात आला आहे. या बंगल्याची प्रत्येक भिंत न् भिंत पाडण्यात आली आहे. किरीट सोमय्या यांनी या तोडक कारवाईचा व्हिडीओ ट्विट करून माहिती दिली आहे. तसेच हा बंगला किती प्रमाणात तोडला याची पाहणी करण्यासाठी सोमय्या स्वत: दापोलीत जाणार आहेत.

पुढचा नंबर कोणाचा ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा दापोलीतील अलिशान बंगला जमीनदोस्त करण्यात आला आहे. परवानगी न घेताच हा बंगला बांधण्यात आल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर आज या बंगल्यावर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. नार्वेकर यांच्या बंगल्यावरील कारवाई हा मुख्यमंत्र्यांसाठी मोठा दणका असल्याचं मानलं जात आहे.दरम्यान, आज नार्वेकर यांचा बंगला तोडण्यात आला आहे. आता पुढचा नंबर राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या रिसॉर्टचा असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. सोमय्या यांनी तसं ट्विटच केलं आहे.

नार्वेकर यांच्या बंगल्याप्रकरणी सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी आरोप केले होते. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा डावा हात असलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी दापोलीत मुरुड गावाच्या समुद्र किनाऱ्यावर 72 गुंठा जागा घेतली, त्यात कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता गैरकायदेशीररित्या भव्य दुमजली बंगल्याचे काम जोरात सुरु केले आहे. मोठ्या प्रमाणात जंगलाची, झाडांची नासधूस सुरु आहे. तसेच मोठं उत्खननही चाललं आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. एका बाजूला कोव्हिडमुळे नागरिक मृत्युमुखी पडत आहेत. त्याच वेळेला शिवसेनेचे मंत्री अनिल परब आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉकडाऊनच्या काळात भव्य रिसॉर्ट आणि बंगले बांधत आहेत. असे असताना सरकार मात्र या दोघांना पाठीशी घालत आहे, असा आरोप त्यांनी केला होता. सोमय्या यांनी याआधी रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी तक्रार केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याला या प्रकरणात लक्ष्य केल्याने कोकणातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कोविड’साठी मुख्यमंत्री सहायता निधीतून सुमारे १२३ कोटी खर्च

News Desk

इंदापूर शहरात एकाच दिवसात २ जण कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

देशात १९९३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk