HW News Marathi
महाराष्ट्र

कोथरूडमध्ये लवकरच उभारणार ग.दि. माडगूळकर यांचे स्मारक

पुणे | कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या परिसरामध्ये ग.दि. माडगूळकर यांचे स्मारक तयार होणार असून याचवर्षी स्मारकाच्या बांधकामाला सुरुवात होईल, असे आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी दिले आहे. विविध जागांच्या पाहणीनंतर कोथरुडमधील जागा निश्चित करण्यात आली आहे. गदिमांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी पालिका कधीही कमी पडणार नाही, असेही यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले आहे.

संवाद पुणेतर्फे ग.दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ‘गदिमायन’ हा गीत संगीताचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. संवाद पुणेतर्फे यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, मंजुषा खर्डेकर, नगरसेवक दीपक पोटे आणि माडगूळकर कुटुंबीय उपस्थित होते.

गदिमांच्या स्मारकाचे दीर्घकाळ रखडलेले काम सुरु होणार

“पुणे हे संस्कृतीचे माहेरघर आहे. गदिमांनी पुण्याला खूप काही दिले. गेल्या अनेक वर्षांपासून गदिमांचे स्मारक रखडले होते. स्मारकाची जागा निश्चित झाली होती, मात्र स्मारकाच्या बांधकामाला जराही सुरुवात झालेली नव्हती. मात्र गदिमांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्मारकाचे दीर्घकाळ रखडलेले काम महानगरपालिकेतर्फे सुरु करण्यात येणार आहे,” असे आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी दिले आहे.

शासनाकडून दिला जाणार २५ लाख रुपयांचा निधी

“मी माझ्या आयुष्यात कृतकृत्य झालो कि बाबूजी, गदिमा आणि भाई या तिघांचाही सहवास मला लाभला आहे. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली की कामाला जलद गतीने सुरुवात होईल. नाविन्यपूर्ण योजनेअंर्तगत स्मारकासाठी शासनाकडून २५ लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे”, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिवाळी सुट्टीमध्ये एसटीच्या दररोज १ हजार  जादा फेऱ्या – अनिल परब यांची माहिती  

News Desk

“तो आवाज माझ्या मुलाचा नाही!”,अरूण राठोडच्या आईचा खुलासा…

News Desk

विनाकारण बाहेर निघाल तर निघेल गाढवावरून धिंड, गावकर्‍यांनी घेतला एकमुखाने निर्णय

swarit