HW News Marathi
महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार! शिक्षणमंत्र्यांची माहिती

मुंबई | राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तसेच वेळापत्रानुसारच परीक्षा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. शिक्षणमंत्री व बोर्ड अध्यक्ष यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

दहावी व बारावीच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने न घेता, ऑनलाईन स्वरूपात घेण्यात याव्या, अशी मागणी अनेक विद्यार्थी करत असून या मागणीसाठी त्यांनी राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलने केली. मात्र, विद्यार्थ्यांच्या या मागणीवर शिक्षण क्षेत्राच्या अभ्यासकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तर या पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळाची बैठक पार पडली असून या बैठकीत परीक्षा ऑनलाईन घेण्यास तशी व्यवस्था उपलब्ध आहे का, असा प्रश्न शिक्षण तज्ज्ञांनी केला आहे. तसेच आंदोलनकर्त्यांनी सुद्धा परीक्षांबाबत योग्य पर्याय सुचवावा, असंही शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांनी म्हंटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून रेशनिंगविषयी तक्रार आणि माहितीसाठी हेल्पलाईन नंबर

News Desk

“चूक नसलेल्यांना शिक्षा केली, तर काय करायचं?”, शेलारांचा शरद पवारांना सवाल

News Desk

देवेंद्र फडणवीस माझ्याकडे १२-१८ तास राहायचे, खडसेंनी करुन दिली आठवण

News Desk