HW News Marathi
महाराष्ट्र

तासाभरात कर्मचाऱ्यांना मिळणार २ महिन्यांचा पगार  आणि दिवाळी बोनस – अनिल परब

मुंबई | एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच बोनस देणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा पगारही देण्यात येणार आहे. तीन महिन्यांपैकी दोन महिन्यांचा पगार देणार असल्याची मोठी घोषणा अनिल परब यांनी केली आहे. तासाभरात या महिन्याचा पगार जमा होणार असल्याचीही माहितीही अनिल परबांनी दिली आहे.

एसटीच्या १ लाख १० हजार कर्मचाऱ्यांच्या तीन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी एसटी कामगार संघटनेनं आज राज्यभर आक्रोश आंदोलन केलं. कोरोनाच्या काळात सोयी-सुविधांचा अभाव असताना एसटी कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. त्यामुळं एसटी महामंडळाचे बरेचसे कर्मचारी कोरोना बाधितही झाले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीतही काम करत असताना या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचं वेतन मिळालं नाही. त्यामुळं आज एसटी कर्मचाऱ्यांनी घरासमोरच कुटुंबियांसमवेत आक्रोश आंदोलन केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशमुखांना हटवण्याचे बळ मुख्यमंत्र्यांमध्ये नाही!, भाजपची बोचरी टीका

News Desk

भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्राची उपमुख्यमंत्र्यांकडून लोकार्पणपूर्व पाहणी

Aprna

सांगली महापालिकेप्रमाणे राज्यात इतर ठिकाणीही भाजपाला धोबीपछाड देऊ !: नाना पटोले

News Desk