HW News Marathi
महाराष्ट्र

MPSC संदर्भात राज्य सरकारने दुर्लक्ष करु नये ! फडणवीसांची टीका

मुंबई। लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं अखेर पुण्याल्या फूरसुंगीत एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडलीय. ह्याच घटनेच्या आधारावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. MPSC संदर्भात राज्य सरकारनं दुर्लक्ष करु नये. स्वायत्त संस्थेला पूर्ण स्वातंत्र्याने काम करु द्यायला हवं. परीक्षा पास झाल्यानंतर दोन दोन वर्षे मुलाखती होत नाहीत. पोस्टिंग मिळत नाही म्हणून झालेल्या आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी पुण्यातील तरुणाच्या आत्महत्येवर सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे.

राज्य सरकारला फटकारलं-

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुनही फडणवीस यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा फटकारलंय. सरकार पोलीस यांच्यामार्फत लोकांना थांबवू शकेल. पण मनातील खदखद थांबवू शकणार नाही. भोसले समितीनं स्पष्ट म्हटलं आहे की, मागासवर्गीय आयोग नेमावा लागेल. हा राज्य सरकारचा विषय आहे, केंद्र सरकारचा नाही, असा दावा फडणवीस यांनी पुन्हा एकदा केलाय. इतकंच नाही तर आषाढी वारीवरुनही फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. भागवत धर्माची पताका खाली ठेवायला सांगणं चुकीचं आहे. मोगलाई आणि निजाम काळातही असं झालं नव्हतं, अशा शब्दात फडणवीस यांनी वारीबाबतच्या निर्णयावर राज्य सरकारला फटकारले.

रोहित पवारांनी केली मागणी-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं अखेर पुण्यात एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केलीय. स्वप्नील लोणकर असं या तरुणाचं नाव आहे. नैराश्यातून त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारकडे विनंती करत MPSC परीक्षा त्वरित घेण्यात याव्यात तसंच प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात, असं म्हटलं आहे. कोरोनामुळं स्थगित केलेली MPSC ची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळं युवा पिढी नैराश्यात आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन ही परीक्षा त्वरित घेण्यात यावी आणि प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात, अशी मागणी रोहित पवार यांनी ट्विट करुन सरकारकडे केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवृत्त न्यायाधीशांच्या एक सदस्यीय समितीबाबत प्रश्न करणारे फडणवीस ही दुतोंडी भाषा योग्य नाही !

News Desk

वेणा तलावात दहा जण बुडाले

News Desk

ठाण्यात पेट्रोल पंप चालकाकडूनच पेट्रोलची चोरी

News Desk