HW News Marathi
महाराष्ट्र

चौथीच्या पुस्तकातून शिवरायांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न

मुंबई | राज्यत सध्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू आहे. यादरम्यान  राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या कारभारावर अनेकवेळा प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले आहेत. या मंडळाने चौथीच्या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासात गाळण्यात आला आहे. महाराष्ट्राची संस्कृती आणि इतिहास माहिती होण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या पाठपुस्तकार देण्यात येते, मात्र, राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या अजब कारभाराने राज्यात त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना शिवाजी महाराजांचा इतिहास कधीही न बदलण्याचा ठराव विधिमंडळात झाला होता. त्यानंतर अनेक सरकार बदलली मात्र पुस्तकातील अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कायम ठेवण्यात आला होता. या प्रकारावर बोलण्यास आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाकडून  कोणती प्रतिकिया आली नाही.

या प्रकारावर खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी संताप व्यक्त केला आहे. मी “केंद्रीय शिक्षण मंडळाकडून’ शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जावा म्हणून प्रयत्न करतोय, अनेकदा केंद्रीय शालेय शिक्षण मंत्र्यांची या संदर्भात भेट घेतली आहे.”, असे ट्वीट संभाजी महाराज यांनी केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Hw Exclusive | टिकटाॅकपेक्षा भारत महत्वाचा, टिकटाॅकस्टार गुलिगत

News Desk

सरकारी कामात नियोजन दिसत नसेल तर सरकारला प्रश्न विचारले जाणारचं

News Desk

जागतिक पातळीवर विद्यार्थी यशस्वी व्हावेत हाच शिक्षण विभागाचा प्रयत्न! – वर्षा गायकवाड

Aprna