Site icon HW News Marathi

अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणारा देखावा असणारा शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार; राज्य सरकारची घोषणा

मुंबई | नुकतेच प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या (Afzal Khan) कबरीजवळ अतिक्रमण हटवण्यात आले. यानंतर राज्य सरकारने अतिक्रमण हटविल्यानंतर येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानचा कोथळा बाहेर काढणारा देखावा असणारा भव्य पुतळा उभारणार असल्याची घोषणा राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी केली आहे. या भव्य पुतळ्यासोबत लाईट आणि साऊंड शो सुद्धा असणार आहेत.

अफझल खानच्या कबरीसोमर अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले.  प्रतापगडाच्या पायथ्याशी 10 नोव्हेंबर रोजी महाराजांनी अफझल खानाचा वध केले होता. सरकारने याच दिवशी अफझल खान बांधकाम पाडण्यात आले. अफझल खानच्या वधाला यंदा 350 वर्ष पूर्ण झाले असून कबरीजवळील अनिधकृत बाधकाम राज्य सरकारने पाडले.

दरम्यान, अफझल खानच्या कबरीजवळ आणखी तीन कबरी आढळून आल्याची माहिती साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुतेश जयवंशी यांनी ही माहिती माध्यमांना दिली आहे. यासंदर्भात महसूल प्रशासनाने अधिक माहिती मागितली आहे.

 

 

Exit mobile version