HW News Marathi
महाराष्ट्र

शेरास सव्वाशेर ! अनिल देशमुखांच्या ‘गझली टोल्या’ला मुनगंटीवारांचं गंमतीदार प्रत्युत्तर

मुंबई | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा (१० मार्च) शेवटचा दिवस आहे. आजही भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृह दणाणून सोडलं. गृहमंत्री अनिल देशमुख यांना टार्गेट करत त्यांच्यावर जोरदार टीकाही केली. अनिल देशमुखांना ते म्हणाले की, तुम्ही माझ्या जवळच्या मित्रांपैकी आहात. पण मनसुख हिरेन यांच्या केसमध्ये तुमच्या शांत स्वभावाला काय झाले समजलं नाही. पुढे त्यांनी असंही म्हटलं की, तुम्हाला गृहखातं यासाठी दिलं कारण गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासाठी विदर्भाच्याच नेत्यांचा वापर केला जातो.

यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकासआघाडी सरकारमधील काही नेत्यांची खाती वाचून सांगितली. यामध्ये सुनील केदार, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत यांच्याकडे असलेल्या खात्यांची वेगळ्याच पद्धतीने ओळख सभागृहात करुन दाखवली. मुनगंटीवारांच्या या स्पष्टीकरणानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुनगंटीवारांना पलटवार केला.

अनिल देशमुख असं म्हणाले की, “मुनगंटीवारांनी सगळ्यांची नावं घेत त्यांच्या खात्याची ओळख करुन दिली. पण सुधीरभाऊ मागची ५ वर्ष तुम्ही विसरलात. देवेंद्र फडणवीसही विदर्भाचे होते आणि मुख्यमंत्री होते याचा आंनदच आहे. पण देवेंद्रभाऊंपेक्षा तुम्ही किती सिनीयर होतात. पण ५ वर्ष तुम्ही तुमचं दु:ख लपवून ठेवलं. अनेकदा सुधीरभाऊ एअरपोर्टवर भेटायचे तेव्हा त्यांना विचारलं की. ‘क्यू मायूस हो, तर ते झूठी हसी’, दाखवत होते. तुमच्या मनातलं दुख आम्हाला कळतं होतं, असा टोमणा देशमुखांनी लगावला.

पुढे ते असंही म्हणाले की, “मी सिनीयर, माझा ( सुधीर मुनगंटीवार) मुख्यमंत्री होण्याचा चान्स पण माझा नंबर लागला नाही. तुमचं दुख पाहून एक गझल आठवते. ‘तुम इतना क्यों मुस्कुरा रहे हो, क्या गम है जो छुपा रहे हो, आखों में नमी हसी लबो पै क्या हाल है क्या दिखा रहे हो’, अशी तुमची हालत होती.

यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “माझं पद होतं FM म्हणजे Finance Minister . याचा अर्थ F फॉर फडणवीसांची शक्ती आणि M फॉर मुनगंटीवारांची शक्ती. याचा अर्थ दोन्ही शक्ती माझ्याकडे होती. असं म्हणत मुनगंटीवारांनी अनिल देशमुखांच्या उत्तराला प्रतिउत्तर दिलं आणि सभागृहात हशा पिकला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ कोटींहून अधिक ज्येष्ठांनी घेतला ‘एसटी’च्या मोफत प्रवासाचा लाभ

Aprna

नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी एल्गार, ४ जिल्ह्यांत आंदोलन

News Desk

 मेगाभरतीवरून चंद्रकांत पाटलांचा  यू-टर्न

swarit