HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

“पडळकरांनी गांजा घेऊन बिरोबाची खोटी शपथ घेतली होती का?”, शेळकेंचा पलटवार

पिंपरी | राज्यातील कोरोना स्थिती चिंताजनक होत असताना राज्याची आरोग्य यंत्रणा जोखमीने काम करत आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना विरोधकांच्या टीकेला काही दिवसांपासून सामोरे जावे वागत आहे. अशात काल (२९ एप्रिल) भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राजेश टोपेंवर अत्यंत गंभीर टीका केली होती. आरोग्यमंत्री गांजा पिऊन प्रेस घेतात का अशी टीका त्यांनी केली होती. त्यांच्या या टीकेचा

मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी घेतला आहे. पडळकरांनी गांजा घेऊन बिरोबाची खोटी शपथ घेतली होती का? असा पलटवार शेळकेंनी केला आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असताना केवळ वैयक्तिक प्रसिद्धीसाठी पडळकर बेताल वक्तव्य करीत आहेत, असा हल्लाबोल शेळके यांनी केला आहे. कोरोना प्रतिबंधासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार पडळकर यांनी आरोग्यमंत्र्यांविषयी पातळी सोडून बेताल वक्तव्य करणे म्हणजे कोरोनामध्ये लढणाऱ्या योद्ध्यांची चेष्टा केल्यासारखेच आहे, असे शेळके यांनी म्हटले आहे.

राज्याची स्थिती अत्यंत आव्हानात्मक आहे. कोरोनाचा हाहाकार चालू असताना अशा प्रकारची टीका करू नये. आरोग्यमंत्री टोपे यांच्यासह राज्याची सर्व आरोग्ययंत्रणा स्वतःच्या जीवावर उदार होऊन कर्तव्य बजावत आहेत. या पार्श्वभूमीवर वैयक्तिक प्रसिद्धीसाठी केलेली बेताल वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशाराही आमदार शेळके यांनी दिला आहे.

पडळकर यांना फक्त प्रसिद्धी मिळवण्यात रस असल्याने ते टीका करताना दिसत आहेत. बेताल वक्तव्ये करून प्रसिद्धी मिळविण्यात ते माहीर आहेत. त्यांनी टीका जरूर करावी, मात्र टीका करताना तोल जाणार नाही, याची काळजी घ्यावी. महाराष्ट्रावरील संकटाच्या काळात मदत करणे शक्य नसेल तर किमान जिभेला लगाम लावावा, असा सल्लाही शेळके यांनी दिला आहे.

काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर?

“काल सकाळी राज्याच्या पालकमंत्र्यांनी घोषित केलं की १ तारखेपासून आम्ही १८ वर्षांवरील सगळ्यांचे आम्ही लसीकरण करणार आहोत. नंतर ४ वाजता सांगितलं की ते करता येणार नाही. म्हणजे हे लोक पुरते गोंधळलेले आहेत. सकाळी जी प्रेस घेतली होती, ती गांजा ओढून घेतली होती का ? यांना उठ सूट केंद्राकडे बोट दाखवायचं आहे. यांना केंद्राकडे बोट दाखवायचं आहे. मुळात विचारसरणी एक नसताना, कोणताही अजेंडा नसताना ते एकत्र आले आहेत,” असे गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

भाजपला विरोध करण्यासाठी हे एकत्र आले

पुढे बोलताना त्यांनी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांवर सडकून टीका केली आहे. भाजपचं राजकीय प्रस्थ समाप्त करण्यासाठी हे पक्ष एकत्र आल्याचा आरोप पडळकर यांनी केला. “कोणतीही विचारधारा तसेच अजेंडा नसताना हे तिन्हा पक्ष एकत्र आले आहेत. भारतीय जनता पार्टीची जिरवण्यासाठी ते एकत्र आले आहेत. मात्र, भाजपचं काम चांगलं असल्यामुळे त्यांना ते जमलं नाही. यामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेचं जिरवण्याचं काम मात्र या सरकारने केलं आहे,” असा टोला पडळकर यांनी गलावला. तसेच पुढे बोलताना त्यांनी राज्य सरकारने या सर्वांमधून बाहेर येऊन महाराष्ट्रात कोणाचीही मृत्यू होऊ नये त्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे.

राजेश टोपे काय म्हणाले होते?

राज्याला मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होणार नाही. त्यामुळे १ मे पासून राज्यात १८ वर्षांवरील नागरिकांचं मोफत लसीकरण सुरू होणार नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी २८ एप्रिल रोजी स्पष्ट केलं.काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. राज्यात सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र लगेच मोठ्या प्रमाणावर लस मिळणार नसल्याने राज्यात १ मे रोजी लसीकरण करण्यात येणार नाही. मे अखेरीपर्यंत व्हॅक्सीन मिळाली तर लसीकरण करता येईल, असं सांगतानाच लसीकरणासाठी वयोगटाचे टप्पे करण्याचा विचार सुरू आहे. त्यानुषंगाने प्रत्येकाला लस मिळेल. तसेच येत्या सहा महिन्यात हे लसीकरण पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे, असं टोपे यांनी सांगितलं.

Related posts

उद्याच सादर होणार मराठा आरक्षणाचा एटीआर

News Desk

भाजपाच्या या निर्णयामागे संघाचा हात ?

News Desk

बागायती क्षेत्राच्या हस्तांतराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पवार साहेबांचा एक फोन पुरेसा – बाळासाहेब थोरात

News Desk