HW News Marathi
महाराष्ट्र

पार्थ पवारांबद्दल प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळेंनी दिली ही प्रतिक्रिया

मुंबई | सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवानेते पार्थ पवार सध्या राष्ट्रवादीशी आणि आघाडी सरकारशी विसंगत भूमिका घेताना दिसत आहे. पार्थ पवार यांच्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी हात जोडले आहेत. प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे यांनी हात जोडले आहेत. पार्थ पवार यांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. शरद पवारांनी पार्थ पवारांना जाहीरपणे फटाकरले होते. सीबीआयकडे सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचा तपास गेल्यानंतर सत्यमेव जयते असे ट्विट पार्थ पवार यांनी केले होते. याबाबत सुप्रिया सुळेंना विचारलं असता, त्यांनी त्यांनी यावर हात जोडत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

सुशांतसिंग राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी पार्थ पवार यांनी केली होती. या मागणीचं पत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून दिलं होतं. यानंतर पार्थ पवारांना शरद पवारांनी खडसावलं. पार्थ पवार अपरिपक्व आहेत, त्यांच्या मागणीला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, असं शरद पवार म्हणाले होते. पवारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीमध्ये नाराजी नाट्य रंगलं. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर पार्थ पवार कमालीचे नाराज झाले. त्यांनी पवार कुटुंबातल्या अनेकांची भेट घेतली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या पायगुणाने आता फक्त Dinosour आणि Alien दिसायचे राहिले, निलेश राणेंचा प्रहार! 

News Desk

ईडीने आज मुंबईत येस बँकेच्या कर्जदारांवर छापे टाकले

News Desk

शिवसेनेच्या गळतीच्या प्रमाणात वाढ

News Desk