HW News Marathi
महाराष्ट्र

‘हे’ एक षडयंत्र !

पुणे | ‘आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन संपूर्ण राजकारणात गदारोळ झाला होता. अजूनही लागलेली ही आग धुसफूसतच आहे. या पुस्तकावर अनेक राजकीय नेत्यांनी विरोध दर्शविला होता. तसेच संजय राऊत यांनी भाजपातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही केली होती. दरम्यान, संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेने काल (१७ जानेवारी) सांगलीत बंदची हाक पुकारली होती.

या बंदच्या हाकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोध दर्शवला होता. माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर गेले असताना ही बंदची हाक पुकारणे म्हणजे राजकीय षडयंत्र आहे असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा द्या असं खळबळजनक वक्तव्य करणारे संजय राऊत वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. दरम्यान, त्यांच्या याच वक्तव्यामुळे काल सांगलीत बंदची हाक पुकारली होती. या वादग्रस्त विधानाबद्दल सुप्रिया सुळे यांना विचारले असता हा बंद चुकाचा होता असा दावा त्यांनी केला. ‘ज्या शिवछत्रपतींनी आपल्याला कष्ट करायला शिकवलं. त्यांच्या नावाचा वापर करून बंद करणं मला अयोग्य वाटतं,’ असं त्यांनी भिडे यांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘प्रयास’च्या सायकल रॅली माध्यमातून वाहतूक नियम आणि आरोग्याविषयी जनजागृती

News Desk

उद्धव ठाकरेंचे पाय हवेत होते ते जमिनीवर आले, आनंद आहे!

News Desk

‘…ही ‘हेराफेरी ४’ साठी परफेक्ट स्क्रिप्ट, त्यात नवाबला ‘बाबूभाई’चा रोल द्या’, नितेश राणेंचा टोला

News Desk