HW News Marathi
महाराष्ट्र

पंतप्रधान जरी वेगळ्या विचाराचे असेल तरी त्यांना आपलंच  पुणे हवहवसं वाटतंय – सुप्रिया सुळे

पुणे | उद्या (२८ नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्यासाठी येणार आहेत. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी पुण्यात आपल्या कामगिरीचे कौतुक करायला येत आहेत असे म्हटले आहे.आपल्या सरकारला एक वर्ष पूर्ण होणार आणि देशाचे पंतप्रधान आपल्या जिल्ह्यातल्या ठिकाणी काम कसे होत आहे हे बघण्यासाठी येणार याच्यापेक्षा काय मोठे यश आपल्या सरकारचे असेल, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. देशाचे पंतप्रधान जरी वेगळ्या विचाराचे असतील तरी देखील त्यांना आपलंच पुणे हवहवस वाटतंय असा टोमणा देखील सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

महाविकास आघाडीचे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात खासदार सुप्रिया सुळे आल्या होत्या यावेळी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणेसह त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

लोकं सारख म्हणतात हे सरकार पडणार, हे एकताना मला गमंत वाटते असे म्हणत खासदार सुळे यांनी इंग्रजीमधील एक म्हण म्हणत जी भांडी मोकळी असतात ती फार वाजतात … त्याच्यामुळे आवाज करायचा पाहिजे तितका करा आणि सरकार पडल तर बघु काय करायच ते… असं थोडी आहे की आयुष्यभर सगळ्यांनी सत्तेत राहायच आज आमची टर्म आहे कधीतरी त्यांची येईल असे म्हणत हे सरकार स्थिर व टिकणारे सरकार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेचे सरकारमधील मित्रपक्षाच्या नाराजीवर सूचक विधान 

News Desk

पंढरपूर मंगळवेढा फेरनिवडणुकीची मागणी राष्ट्रवादीने केली नाही, राष्ट्रवादीच्या लीगल सेलचे स्पष्टीकरण!

News Desk

‘ग्रीन फिल्ड महामार्गा’मुळे अहमदनगर लॉजिस्टिक कॅपीटल बनणार! – नितीन गडकरी

Aprna