Site icon HW News Marathi

सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट, घटनेनंतर काय म्हणाल्या…

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या साडीने अचानक आग लागल्याची घटना घडली होती. वेळीच खबरदारी घेतल्याने मोठा अनर्थ टाळला. पुण्यातील हिंजवडी भागामध्ये कराटे क्लासेसचं प्रशिक्षण केंद्रच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळेंच्या साडीने (Saree) अचानक पेट घेतला होता. यावेळी सुप्रिया सुळेंनी टेबलावर ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करताना. टेबलवर जवळ ठेवलेल्या दिव्याने सुप्रिया सुळेंची साडीला आग लागली. सुदैवाने सुप्रिया सुळेंच्या साडीला लागलेली आग ही मोठी नव्हती. त्यामुळा ताबडतोब आग विझविण्यात आली.

दरम्यान, सुप्रिया सुळेंची साडीला आग लागलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. सुदैवाने घटनेत सुप्रिया सुळे यांना कोणतीही हानी झालेली नाही. वेळीच आग तात्काळ आग विझविण्यात आली. या घटनेनंतर सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, “मी थोडक्यात बचावले, मुळशीला कराटे प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनाला गेलो होते. त्यावेळी टेबलवर असलेल्या मेनबत्ती होती. या मेनबत्तीनेच माझ्या साडीने पटकन पेट घेतला आणि ते आमच्या लगेच लक्षात आले. यानंतर माझे सलग कार्यक्रमत असल्यामुळे कपडे बदलायला वेळ मिळाला नाही.”

 

 

 

 

 

 

Exit mobile version