HW News Marathi
राजकारण

सुरेखा पुणेकरांसह दिग्गजांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी लोककलावंत सुरेखा पुणेकर आणि गायिका देवयानी बेंद्रे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश झाला. तसेच यावेळी मुंबई महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते बबनराव गवस, मनसेच्या महिला पदाधिकारी मनिषा खैरे,अशोकराव सवने, प्रभाकर शेट्ये, संजय त्रिपाठी,सुरेश बागवे, नितीन पाटील, ओंकार गवस यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सर्व नवीन सदस्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले. मनोज व्यवहारे यांच्या पुढाकाराने पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी पक्षात प्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांना शुभेच्छा देऊन त्यांचे स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रस पक्षाच्या मुंबई कार्यालयात प्रवेश सोहळा पार पडला.

अपक्ष गटनेते कैलास भालचंद्र बारणे यांनीही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये‌ जसे सर्व जातीधर्मातील लोक आहेत त्याप्रमाणेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा देखील सहभाग असला पाहीजे, शरद पवार यांची भूमिका आहे. आज प्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांचे पक्षात स्वागत करतो, असे यावेळी अजित पवार म्हणाले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक अपक्ष गटनेते कैलास भालचंद्र बारणे यांनीही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

विधान परिषदेच्या 12 जागांची यादी राज्यपाल यांनी अद्याप मंजूर केलेली नाही. सुत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या वृत्तानुसार, राजू शेट्टी यांच्या नावावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातून राजू शेट्टी यांचं नाव दिलं होतं. राज्यापालांच्या आक्षेपानंतर राष्ट्रवादीने राजू शेट्टी यांचा पत्ता कट केल्याचं बोललं जात आहे. त्याजागी आता सुरेखा पुणेकर यांची वर्णी लागणार का? अशी चर्चा आता रंगली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गांधी घराण्याबाहेरच्या कार्यकर्त्याला पक्षाचा अध्यक्ष करा !

News Desk

#MarathaReservation : ही श्रेय घेण्याची वेळ नाही !

News Desk

वाजपेयींची प्रकृती सध्या स्थिर

News Desk